JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / ‘या’ 5 पांढऱ्या वस्तू हातातून पडणं आहे अशुभ, जाणून घ्या काय सांगते शास्त्र

‘या’ 5 पांढऱ्या वस्तू हातातून पडणं आहे अशुभ, जाणून घ्या काय सांगते शास्त्र

हिंदू धर्मात अनेक श्रद्धा प्रचलित आहेत. ज्यांच्याबद्दल आपल्याला धार्मिक ग्रंथांमध्ये वाचायला मिळते. त्यांच्या आधारावर, आपण सर्व आजही त्या विश्वासांचे पालन करतो. अशा अनेक गोष्टी धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिल्या गेल्या आहेत, ज्या आपल्या हातातून पडणं अशुभ मानलं जातं. चला जाणून घेऊया, त्या कोणत्या गोष्टी आहेत.. भोपाळचे रहिवासी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी याविषयी माहिती दिली आहे.

0105

शास्त्रात मीठ पडणं अशुभ मानलं गेलं आहे. कारण हातातून मीठ पडलं की माणसाच्या आयुष्यात आर्थिक संकट सुरू होतं. त्याचे ग्रहही त्या व्यक्तीला त्रास देऊ लागतात.

जाहिरात
0205

हिंदू धर्मात दूध अत्यंत शुद्ध मानलं जातं. ते जमिनीवर पडल्याने मुलांच्या जीवनातील समस्या वाढतात. तर दुसरीकडे वास्तुशास्त्रानुसार दूध गॅसवर किंवा चुलीवर पडणं शुभ मानलं जातं.

जाहिरात
0305

हिंदू देवी-देवतांच्या पूजेमध्ये तांदूळ वापरला जातो. हे सर्वात शुद्ध धान्य मानलं जातं. तांदूळ पडणं किंवा तांदूळ भरलेलं भांडे पडणं हे अशुभ वृत्ताचं लक्षण आहे.

जाहिरात
0405

हिंदू धर्मात पूजेसाठीही नारळ वापरला जातो. तो हातातून पडणं हे माणसाच्या प्रगतीत अडथळे निर्माण करण्याचे संकेत देतं.

जाहिरात
0505

धार्मिक श्रद्धेनुसार साखर खाली पडणे अप्रिय बातमी मिळण्याचे संकेत देते. साखर देवतांना भोग म्हणून अर्पण केली जाते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या