JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / वृद्धांना सोबत घेऊन प्रवासाला निघताय? मग अशा प्रकारे घ्या त्यांची काळजी

वृद्धांना सोबत घेऊन प्रवासाला निघताय? मग अशा प्रकारे घ्या त्यांची काळजी

Travel tips for senior citizens : प्रवास करताना, बहुतेक लोक सर्व त्रास आणि थकवा मागे टाकून प्रवासाचा पूर्ण आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा घरातील वडीलधारी मंडळी तुमच्यासोबत सहलीला जाण्याचा विचार करत असतील, तेव्हा त्यांच्या आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रवासाच्या नादात अनेकवेळा वृद्धांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. थोडासा निष्काळजीपणा देखील त्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही वृद्धांसोबत प्रवास करत असाल तर काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करून तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

0105

प्रवासाला जाण्यापूर्वी वृद्धांची आरोग्य तपासणी करायला विसरू नका. तसेच, रक्तदाब आणि वृद्धांचे साखरेची पातळी सामान्य झाल्यानंतरच सहलीला जाण्याचा बेत करा. याशिवाय प्रवासापूर्वी डॉक्टरांचा विशेष सल्ला घ्या आणि प्रवासादरम्यान प्रत्येक सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करा.

जाहिरात
0205

प्रवासात पॅकिंग करताना वृद्धांची आवश्यक औषधं आणि प्रथमोपचार पेटी सोबत ठेवण्यास विसरू नका. तसेच, प्रथमोपचार पेटीत बीपी मॉनिटर आणि शुगर लेव्हल तपासण्याचं मशीन तसंच, काही वेदनाशामक आणि अतिरिक्त औषधं समाविष्ट करा.

जाहिरात
0305

प्रवासादरम्यान थकवा येणे सामान्य आहे. मात्र, प्रवासाच्या उत्साहात लोक थकव्याकडे लक्ष देत नाहीत. परंतु, वृद्धांच्या बाबतीत असे अजिबात करू नका. फ्लाइट किंवा ट्रेनपासून प्रवासाच्या गंतव्यस्थानापर्यंत, वृद्धांच्या आरामाची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करा.

जाहिरात
0405

प्रवासादरम्यान, वृद्धांना रिकाम्या पोटी ठेवणे किंवा बाहेरील तळलेले पदार्थ खाऊ घालणे टाळा. घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही वृद्धांसाठी काही हलके अन्न पॅक करू शकता. तसंच, मधल्या काळात वृद्धांना ड्रायफ्रुट्स आणि स्नॅक्स देत राहा.

जाहिरात
0505

प्रवासाला निघण्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांचं तिकीट कन्फर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. तिकीट कन्फर्म न झाल्यास वृद्धांना सर्वत्र उभं राहावं लागू शकतं. त्यामुळे प्रवासाच्या सुरुवातीला त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता असते आणि तुमच्या प्रवासातील मजा खराब होण्याची शक्यता असते. (अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. न्यूज18 याची हमी देत नाही. कृपया अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या