IIFL Wealth Hurun इंडियाने आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली. त्यामधील देशातील टॉप 10 अब्जाधीश नेमके कोण आहेत पाहा. साडेसहा लाख कोटींची संपत्ती सर्वांत श्रीमंत व्यक्तीकडे आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतातल्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. अंबानींची सध्याची संपत्ती 6,58,400 कोटी रुपये एवढी आहे. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत. त्यांच्या कंपन्यांकडे सुमारे 88 अब्ज डॉलर्सचा महसूल आहे.
एस. पी. हिंदूजा आणि कुटुंबीय भारतात दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत परिवार आहे. आहेत. त्यांच्याकडे एकूण 1,43,700 कोटी रुपये एवढी संपत्ती आहे. हिंदुजा बंधूंचं वास्तव्य सध्या लंडनमध्ये असतं. (Image: Reuters)
भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत शिव नाडर. हे एचसीएलचे संस्थापक असून त्यांची एकूण संपत्ती 1,41,700 कोटी रुपये एवढी आहे. (Image: Getty Images)
गौतम अदानी हे अदानी समूहाचे अध्यक्ष भारतातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 1,14,400 कोटी रुपये एवढी आहे.
विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष अझीम प्रेमजी हे पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 1,14,400 कोटी रुपये इतकी आहे.
सायरस पूनावाला हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. कोरोना लशीमुळे चर्चेत असणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 94,300 कोटी रुपये इतकी आहे. (Image: Getty Images)
राधाकृष्ण दमानी भारतातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती. रिटेल किंग ऑफ इंडिया' म्हणून प्रसिद्ध असलेल्या दमानींची एकूण संपत्ती 87,200 कोटी रुपये एवढी आहे. DMart चे ते मालक आहेत.
उदय कोटक हे भारतातील आठवे श्रीमंत व्यक्ती आहेत. कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष असलेल्या कोटक यांची एकूण संपत्ती 87,000 कोटी रुपये इतकी आहे.
सन फार्मास्युटिकल्सचे संस्थापक दिलीप शंघवी हे भारतातील नवव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 84,000 कोटी रुपये इतकी आहे. (Image: Reuters)
शापूरजी पालनजी मिस्त्री कुटुंबीय भारतातील 10 व्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब आहे. त्यांची एकूण संपत्ती 70,000 कोटी रुपये इतकी आहे.