नवजात बालकांची विशेष काळजी घेणं हे अवघड काम आहे. बाळाचं खाणं-पिणं, झोपणं यासारख्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे पालकांनी लक्ष देणं आवश्यक असतं. मात्र, मुलं जुळी असतील तर, पालकांचंही काम दुप्पट होतं. जुळ्या मुलांना सांभाळणं सोपं नसले तरी काही खास गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही जुळ्या मुलांची विशेष काळजी सहज घेऊ शकता. जेव्हा घरात जुळी मुले असतात, तेव्हा पालक बहुतेक दिवसभर मुलांमध्येच गुंतलेले असतात. अशा वेळी गोंधळल्याची किंवा चिडचिड होण्यासारखीही परिस्थिती होते. तेव्हा, आम्ही तुमच्यासोबत जुळ्या मुलांची काळजी घेण्यासंबंधी काही खास टिप्स शेअर करत आहोत, ज्या वापरून तुम्ही जुळ्या मुलांना व्यवस्थितपणे हाताळू शकता.
एक रूटीन सेट करा : घरात जुळी मुले असल्याने, तुम्ही दोन्ही मुलांसाठी खाणे आणि झोपण्याचे वेळापत्रक आधीच सेट करू शकता. याद्वारे, तुम्हाला बाळाच्या आहार, झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेची कल्पना येईल आणि बाकीची कामं करण्याच्या वेळा तुम्हाला ठरवता येतील. तसंच, 'ट्विन फीडिंग पिलो' (Twin feeding pillow) वापरणं तुमच्यासाठी तुमच्या बाळांना खाऊ घालण्यासाठी एक आरामदायक पर्याय असू शकतो. (Image/Canva)
चॅट ग्रुप्सची मदत घ्या : जर तुम्ही जुळ्या मुलांची काळजी घेण्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असाल, तर तुम्ही सोशल मीडियावर एक्सपिरियन्स मदर्सचा ग्रुप देखील तयार करू शकता. या गटात, जुळी मुले सांभाळणाऱ्या काही मातांना जोडून तुम्ही मुलांच्या विशेष काळजीबाबत महत्त्वाच्या टिप्स मिळवू शकता. (Image/Canva)
कुटुंबातील इतरांची मदत घ्या : जुळ्या मुलांचं संगोपन करणं कोणत्याही आईसाठी एकटीला सर्व काही जमवणं अशक्य आहे. अशा परिस्थितीत, मुलांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या पती किंवा कुटुंबीयांची मदत मागू शकता. तसंच, घरात बेबी सिटर ठेवणं हा देखील मुलांची काळजी घेण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. (Image/Canva)
ब्रेक घ्यायला विसरू नका : जुळ्या मुलांची काळजी घेताना अनेक वेळा पालक स्वतःसाठी वेळ काढायला विसरतात. अशा परिस्थितीत, काही वेळाने तुम्हाला थकवा जाणवतोच; शिवाय, तणाव आणि चिडचिडही वाढते. म्हणून, मुलांची काळजी घेण्याच्या दरम्यान स्वत:ला विश्रांती देण्यास विसरू नका. थोडी विश्रांती घेतल्यावरच तुम्ही मुलांची चांगली काळजी घेऊ शकाल. (Image/Canva)
कपड्यांची निवड : जुळ्या मुलांमध्ये मुलगा असो किंवा मुलगी, दोन्ही मुलांसाठी समान कपडे खरेदी करा. यामुळे, मुलांचे कपडे घालताना तुमचा गोंधळ होणार नाही. जुळ्या बाळांपैकी एक मुलगा आणि एक मुलगी असेल तरी एकाच प्रकारचे कपडे घ्या. (अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. मराठी न्यूज18 त्याची हमी देत नाही.) (Image/Canva)