JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / एसीमध्ये बसल्यानं त्वचा कोरडी होतेय? या सोप्या टिप्स वापरून होईल त्रास कमी

एसीमध्ये बसल्यानं त्वचा कोरडी होतेय? या सोप्या टिप्स वापरून होईल त्रास कमी

Tips to get rid of skin dryness : बहुतेक लोक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी एसी किंवा कुलरच्या थंड हवेत राहणं पसंत करतात. अर्थात, एसी आणि कूलरचा वापर हा उन्हापासून सुटका करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. पण, त्याचे काही दुष्परिणामही आहेत. एसीची थंड हवा अनेकदा त्वचा कोरडी होण्याचं कारण बनते. उन्हाळ्यात जास्त वेळ अशा स्थितीत राहिल्यानं त्वचेतील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे त्वचेत कोरडेपणा, खाज सुटणे आणि जळजळ होण्याची समस्या वाढते. हे टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत.

0105

ऑलिव्ह ऑईलचा वापर कोरड्या त्वचेत ओलावा निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ऑलिव्ह ऑईल त्वचेवर लावा आणि ओल्या कापडाने पुसा. यामुळे छिद्रांमधील घाण साफ होते. तसेच, ऑलिव्ह ऑइल त्वचेतील आर्द्रता वाढवून ओलावा लॉक करण्याचं काम करते.

जाहिरात
0205

एवोकॅडोने फेस मास्क बनवा : उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट करताना आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी अॅव्होकॅडो फेस मास्क उपयुक्त ठरतो. ते बनवण्यासाठी 1 चमचा एवोकॅडो पेस्ट, १ चमचा ऑलिव्ह ऑईल आणि 1 चमचा मध मिक्स करून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

जाहिरात
0305

पपईचा मास्क वापरून पहा: उन्हाळ्यात त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी पपईचा फेस मास्क प्रभावी ठरू शकतो. यासाठी पपईचा तुकडा चांगला बारीक करून घ्या. या पेस्टमध्ये 1 चमचा फ्रेश क्रीम आणि 2 चमचे मध मिसळा आणि त्वचेवर लावा. जेव्हा हा मास्क सुकेल, तेव्हा चेहरा पाण्याने धुवा.

जाहिरात
0405

दूध आणि मधाचा मास्क : पोषक तत्वांनी युक्त दूध कोरडी त्वचा दूर करण्यासाठी प्रभावी ठरतं. दूध आणि मधापासून बनवलेला फेस मास्क त्वचेची जळजळ आणि खाज सुटणं कमी करण्याबरोबरच आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी चांगला आहे. चेहऱ्यासाठी दुधाची पावडर वापरा. 2 चमचे मिल्क पावडरमध्ये 1 चमचा मध मिसळून चेहऱ्याला लावा. पॅक सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवा.

जाहिरात
0505

खोबरेल तेल वापरा : खोबरेल तेल त्वचेवर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा तर दूर होईलच. पण त्वचेचा संसर्गही टाळता येईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्याच वेळी त्वचेमध्ये ओलावा बराच काळ टिकून राहतो. (अस्वीकरण: या लेखात दिलेल्या माहितीची मराठी न्यूज18 हमी देत नाही. हे लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या