JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / घरातली ज्येष्ठ मंडळी चिडचिडी झालीत? नातेसंबंधात गोडवा राहण्यासाठी करा हे सोपे उपाय

घरातली ज्येष्ठ मंडळी चिडचिडी झालीत? नातेसंबंधात गोडवा राहण्यासाठी करा हे सोपे उपाय

Tips to deal with old people : आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर उभे असलेले अनेक वृद्ध लोक बऱ्याचदा नैराश्यात राहतात. त्यामुळे काही वृद्धांचा चिडचिडेपणाचा स्वभाव बनतो. दुसरीकडे, जेव्हा घरातील ज्येष्ठांमध्ये हट्टीपणा आणि राग येणं सामान्य होतं, तेव्हा त्यांच्याशी पटवून घेणं खूप कठीण होतं. अशी परिस्थिती हाताळण्यासाठी वृद्धांशी कसं वागावे, याच्या काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. खरं पाहिलं तर, वृद्धांच्या जीवनातील अनेक अनुभव घरातील तरुण, लहान मुलांना खूप उपयोगी पडतात, असं अनेकदा दिसून येतं. मात्र, कधी-कधी वृद्धांची चिडचिड त्यांच्या मुलांसाठी चिंतेचा विषय बनतो. यासोबतच मुले-मुली आणि वृद्ध यांच्यातील नातेसंबंध बिघडण्याची भीती निर्माण होते. मात्र, आपण हे प्रकरण प्रेमाने देखील हाताळू शकता. वृद्धांची चिडचिड दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत.

0105

वेळ देणं महत्त्वाचं : हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीत घरातील सर्व सदस्य आपापल्या कामात व्यग्र असतात. अशा स्थितीत क्वचितच कुणाला वृद्धांजवळ बसायला वेळ मिळतो. पण, अशा वातावरणात वृद्धांना एकटेपणा जाणवू लागतो आणि त्यांचा स्वभाव चिडचिडा होतो. त्यामुळे दिवसातून थोडा वेळ ज्येष्ठांशी बसून बोला. गप्पा मारा. यातून तुम्ही त्यांच्या अनुभवातूनही शिकाल आणि त्यांनाही खूप छान वाटेल.

जाहिरात
0205

नाराजीचं कारण जाणून घ्या : अनेक वेळा घरातील वडीलधारे लोक रागात असताना मुलांना खूप काही सुनावतात. अशा वेळी त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी त्यांच्या नाराजीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसंच, रागाच्या भरात वडिलधाऱ्यांशी वाद घालण्याऐवजी त्यांच्याशी प्रेमाने बोला आणि समस्या सोडवा.

जाहिरात
0305

तेही महत्त्वाचे असल्याची जाणीव त्यांना करून द्या : वृद्धांना आनंदी ठेवण्यासाठी फार जास्त काही करावं लागत नाही. रोजच्या छोट्या छोट्या कामात त्यांची काळजी घेऊन तुम्ही त्यांना तुमच्या प्रेमाची जाणीव करून देऊ शकता. पायऱ्या चढताना त्यांचा हात धरू शकता. त्यांना फिरायला घेऊन जाणं, खरेदी करणं आणि त्यांच्या आवडीच्या काही छोट्या-छोट्या गोष्टी करून तुम्ही त्यांना आनंदी करू शकता.

जाहिरात
0405

घरातील कामात मदत मागणे : अनेकवेळा आपण वृद्धांना विश्रांती घेण्याचा सल्ला देऊन घरातील कामात मग्न होतो. त्यामुळे वृद्धांना कंटाळा आणि एकटेपणा जाणवतो. त्यामुळे घरातील छोट्या कामात तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. त्यांच्या एकटेपणावर मात करण्यासाठी, त्यांना घरातील कामांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. एकत्र काम करताना तुम्ही त्यांच्यासोबत खूप काही करू शकता.

जाहिरात
0505

समस्या शेअर करा : वृद्ध लोक पटकन टेन्शन घेतात अशा कारणानं काही लोक आपल्या आयुष्यातील समस्या वृद्धांना सांगत नाहीत. पण, याउलट, आपल्या समस्या वृद्धांसोबत शेअर करणं अनेकदा खूप फायदेशीर ठरू शकतं. यामुळे तुम्हाला हलकं तर वाटेलच, पण वडिधाऱ्यांचा अनुभवही तुम्हाला समस्या सोडवण्यासाठी खूप मदत करेल. (अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. मराठी न्यूज 18 याची हमी देत नाही.)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या