आपल्याला आयुष्यात सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आपला आहार हा हेल्दी असणं फार आवश्यक झाले आहे. मानसिक तणाव, चिडचिड कमी करायला चांगला विचार करायला हवा आणि चांगलं खायलाही हवं. मन आनंदी ठेवणारे काही पदार्थ आहेत. याबाबत माहिती वाचा..
चीज हा अतिशय स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहे. बर्गर, पिझ्झा ते पराठे बनवताना आपण त्यात चीज वापरतो. चीजमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमीनो आम्ल असतं, जे तणाव कमी करण्यास आणि चांगली झोप यासाठी मदत करते.
अननस हा सेरोटोनिनचा मोठा स्रोत आहे. Serotonin ला हॅपी हार्मोन म्हणतात. अननस खाल्ल्याने आपल्या शरीरात सेरोटोनिनची पातळी वाढते, परंतु हे फळ ताजं खावं. फळ कापून साठवून ठेवलं की त्यात सेरोटोनिनची पातळी एकदम कमी होते.
टोफू हा इतर पदार्थांच्या तुलनेत ट्रिप्टोफॅनचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. सोप्या भाषेत याला सोया पनीर असेही म्हणतात. त्यात प्रथिने आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा हा सर्वोत्तम स्त्रोत आहे.
सॅल्मन फिश हा ट्रिप्टोफॅनचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. ट्रिप्टोफॅन आपल्या शरीरात मेलाटोनिन आणि सेरोटोनिन सारख्या संप्रेरकांची निर्मिती करून कार्य करते. यामुळे व्यक्तीचा मूड हा कायम आनंदी राहतो.
दररोज मूठभर काजू खाल्ल्याने कर्करोग, हृदयाच्या समस्या आणि श्वसनाच्या समस्यांपासून मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे नट्स हे फायबर, जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडंट्सचे चांगले स्त्रोत आहेत.
टर्की.. हा कोंबड्यासारखा पक्षी पाश्चिमात्य देशात चवीने खाल्ला जातो. टर्कीचं मांस ट्रिप्टोफॅनसाठी सर्वोत्तम स्त्रोत आहे. मेंदूच्या विकासासाठी हे खूप फायदेशीर आहे.