JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नैराश्यातून प्रेरणेकडे! मुंबईची ही 'वजनदार' डान्सर बदलतेय Belly Dancer ची प्रतिमा, आवर्जून पाहा VIDEO

नैराश्यातून प्रेरणेकडे! मुंबईची ही 'वजनदार' डान्सर बदलतेय Belly Dancer ची प्रतिमा, आवर्जून पाहा VIDEO

हत्तीचं पिल्लू, जाडी.. काय काय ऐकावं नाही लागलं, पण प्रीती डगमगली नाही. वजनदार व्यक्तींनी बेली डान्सिंग करायचं नाही का? असं विचारत ती नृत्य करत राहिली.. तिचे हे VIDEO पाहाच

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट: बेली डान्सर (Belly Dancer) म्हटल्यावर त्याभोवती हॉट, सेक्सी अशी विशेषणं लागतात तशी ती डान्सर शिडशिडीत, कमनीय बांध्याचीच असणार हे गृहित धरलं जातं. पण बेली डान्सिंग ही कला आहे आणि वजनदार किंवा जाड्या व्यक्तींनी हा डान्स करायचा नाही, असा काही नियम नाही. Body Shaming चा अनुभव अनेकींना तसाही येतो, त्यातून बेली डान्सरना वगैरे जास्तच. पण मुंबईची डान्सर प्रीती डिसूझा बेली डान्सरची (Mumbai Belly Dancer Preeti Dsouza) तथाकथित प्रतिमा झुगारून बिनधास्त नाचते आणि आता तर वेगवेगळ्या ठिकाणी परफॉर्म करून डान्स शिकवतेसुद्धा. वजन जास्त, शरीर कथितार्थाने कमनीय नाही, भरपूर लठ्ठ तरी बेली डान्सिंगसारखा प्रकार चारचौघांसमोर करताना अर्थातच प्रीतीला अवघड गेलं. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत प्रीती सांगते, डान्स ही पॅशन होती, पण तेवढी पुरत नाही. घरच्यांनासुद्धा सुरुवातीला प्रीतीचं हे नाचणं पसंत नव्हतं. “आईसुद्धा म्हणायची, आधी वजन कमी कर मग नाच. खूप विचित्र दिसतं असं नाचणं वगैरे…’ अगदी डिप्रेशन येईपर्यंत प्रीतीला टोमणे ऐकावे लागले. पण त्यातून ती बाहेर पडली. आज प्रीती डिसूझा बिनधास्त स्वतःचे VIDEO सोशल मीडियावर शेअर करते. तिचं कौतुक होतं. ती दुसऱ्यांना हा नृत्यप्रकार शिकवतेसुद्धा.

‘आम्ही लठ्ठ आहोत म्हणून…’; मराठी अभिनेत्री अक्षया नाईकची Body Shaming वर सणसणीत चपराक

 प्रीतीचे VIDEO पाहिले तर तिच्यातल्या नृत्यकौशल्याला निश्चितच दाद द्यावी वाटते. त्याहीपेक्षा जास्त दाद तिच्यातल्या धैर्याला, सकारात्मकतेला आणि बेधडक वृत्तीला सलाम करावा वाटतो.

नकारात्मक भावनांना दूर लोटणं, टोमण्यांकडे दुर्लक्ष करणं सोपं नव्हतंच. प्रीती सांगते, “आता त्याची सवय झाली आहे. मला आवडतं म्हणून मी नाचते. इतकं ते सोपं आहे. वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असणारच. कुणाला मी हत्तीचं पिल्लू वाटत असेनही. पण हत्तीसुद्धा क्यूटच असतो की, असा विचार आता मी करते.”

शारीरिक ठेवणीचा, वजनाचा बाऊ करू नका, हे सांगण्यासाठी प्रीतीचा बेलीडान्स जणू प्रेरणा आहे. आपल्या शरीराची लाज बाळगू नका, हेच ती या VIDEO मधून सांगू इच्छिते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या