बाहेरुन आल्यानंतर खुप चालल्यानंतर किंवा लाँग ड्राईव्ह नंतर घरी आल्याआल्या आंघोळ करु नये.
मुंबई, 20 मे : अंघोळ (Bath) करणं हा आपल्या डेली रुटीनचा (Daily Routine) भाग आहे. रोज आंघोळ केल्याने आरोग्य (Health) चांगलं राहतं. उन्हाळ्याच्या दिवसात तर, काहीजण दिवसातून 3 ते 4 वेळा अंघोळ करतात. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्यानंतर लगेच अंघोळ केली तर, आरोग्याचं (Health) नुकसान (Loss) होऊ शकतं. कधीकधी चुकीच्या वेळी अंघोळ केल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखीसारखे त्रास व्हायला लागतात. रोज अशाच प्रकारे अंघोळ केल्यास त्याचे गंभीर परिणाम (Serious Consequences) होऊ शकतात. अंघोळ कधी करू नये किंवा अंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती ते पाहुयात. बाहेरून आल्यानंतर बाहेरून आल्यानंतर खुप चालल्यानंतर किंवा लाँग ड्राईव्हनंतर घरी आल्या आल्या अंघोळ करू नये. घरी आल्यावर 30 मिनिटांनी आंघोळ करावी. आपण लाँग ड्राईव्ह किंवा जास्त चालल्यानंतर आपल्या शरीरातील उष्णता वाढलेली असते. अशावेळी शरीरावर पाणी पडल्यानंतर तापमानात लगेच फरक पडतो. यामुळे सर्दी, खोकला आणि डोकेदुखी होऊ शकते. ( अवेळी दुधाचं सेवन ठरू शकतं घातक; जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? ) जेवणानंतर जेवणानंतर लगेच कधीच अंघोळ करू नये. अंघोळ करायची असेल तर जेवणाआधी करावी किंवा जेवणानंतर 2 तासांनी करावी. जेवल्यानंतर शरीरात अन्न पचवण्याची प्रक्रिया सुरू असते, तेव्हा ऊर्जा वाढलेली असते. पण याचवेळी अंघोळ केल्यानंतर शरीराचं तापमान कमी होतं. शरीर आतून गरम आणि वरून थंड झाल्याने अन्न पचन योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे ताप येणं किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. ( Yuck! सकाळी उठताच स्वतःची लघवी पिते ही महिला; कारण वाचून तर बसेल आणखी धक्का ) गरम पदार्थ चहा किंवा कॉफी असे गरम पदार्थ प्यायल्यावर कधीच अंघोळ करू नये. चहा, कॉफी प्यायल्यानंतर 1 तासाने कोमट पाण्याने किंवा 2 तासांनी थंड पाण्याने अंघोळ करावी. जेव्हा आपण गरम पेय पितो तेव्हा त्यांचं तापमान सामान्य पदार्थांपेक्षा जास्त असतं. त्यामुळे शरीरात उष्णता वाढलेली असते. ते तापमान कमी होण्यास वेळ लागतो. झोपून उठल्यावर झोपेमधून जागं झाल्यावर लगेच शॉवर घ्यायची सवय असेल तर, आताच सोडून द्या. त्यामुळे आपल्याला बीपी आणि हार्टशीसंबंधित त्रास होऊ शकतात. झोपेत आपल्या शरीराच तापमान वाढलेंलं असतं आणि ब्लड फ्लो देखील जास्त असतो. अंथरुणातून उठून शॉवर घेण्याच्या सवयीने शरीर गरम असताना त्याच तापमान अचानक खाली जातं. त्यामुळे झोपेमधून उठल्यावर कमीतकमी अर्धा तास अंघोळ करू नये. त्यामुळे आधी ब्रश करून, फ्रेश होऊन मग अर्ध्या तासाने अंघोळ करावी. ( ‘कुणीच जिवंत राहणार नाही’, खळबळजनक ट्वीट करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनाने घेतला जीव ) योगा, एक्सरसाईज किंवा डान्स योगा, एक्सरसाईज किंवा डान्स केल्यानंतर आपलं शरीरात वेगाने ब्लड सर्कुलेशन सुरू होतं. त्यामुळे शरीर गरम होतं. एक्सरसाईज किंवा डान्स केल्यानंतर घाम आल्यामुळे लोक लगेच अंघोळ करतात. मात्र याने नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शरीराचं तापमान नॉर्मल झाल्यावर अंघोळ करावी. त्यावेळी श्वासोच्छवास आणि हृदयाची धडधडही नॉर्मल झालेली असते.