JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / माठातल्या पाण्याची सर फ्रिजच्या पाण्याला कुठे? पुरुषांनो, तुमच्यासाठी तर माठातलं पाणीच सर्वोत्तम

माठातल्या पाण्याची सर फ्रिजच्या पाण्याला कुठे? पुरुषांनो, तुमच्यासाठी तर माठातलं पाणीच सर्वोत्तम

फ्रीजमध्ये ठेवलेलं प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिण्यापेक्षा माठातलं नैसर्गितरीत्या थंड झालेलं पाणी प्यावं. पुरुषांसाठी ठरेल अधिक फायदेशीर, का ते पाहा

0107

फ्रिजच्या पाण्याने तहान जाते पण, माठातल्या पाण्या इतकं ते पाणी आरोग्यासाठी पायदेशीर नसतं. उन्हाळ्यात माठातलं पाणी पिण्याने पुरूषांना तर जास्तच फायदा होतो.

जाहिरात
0207

नैसर्गिक फिल्टर (Natural filter) तज्ज्ञांच्या मते, 4 तासांपेक्षा जास्त काळ माठामध्ये पाणी राहिलं तर, ते नैसर्गिकरित्या शुद्ध होतं. कारण मातीमध्ये नैसर्गिकरित्या दूषित घटक शोषून घेण्याची क्षमता असते.

जाहिरात
0307

वजन कमी होतं पुर्वीच्या काळापासून माठातल पाणी आपण पितो. माठातल्या पाण्याने आपलं मेटबॉलिजम सुधारतं. त्यामुठे शरीरातली चरबी वितळते.

जाहिरात
0407

पुरुषांना फायदा-फ्रिजमध्ये ठेवलेलं प्लास्टीकच्या बाटलीतलं पाणी टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर (Testosterone Hormone) वाईट परिणाम करतं. माठातलं पाणी टेस्टोस्टेरॉन हार्मोन संतुलनात (Balance) मदत करतं.

जाहिरात
0507

श्वसनाचे आजार कोरोनामुळे आपल्या श्वसनप्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळा असला तरी, फ्रिजचं पाणी पिण्याने त्रास आणखीन वाढू शकतो. पण माठाचं पाणी प्यायल्याने खोकला,घसा खवखवणं, सूज यासारखे त्रास होत नाहीत.

जाहिरात
0607

सनस्ट्रोक पासून बचाव भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात उन्हाळ्यात पारा वाढला की सनस्ट्रोक होण्याची भिती वाढते. अनेक ठिकाणी तापमान 40 पार जातं. अशा वेळी माठातलं पाणी थंडावाही देत आणि फ्रिजच्या पाण्याने होणारा कोणताही त्रास होत नाही.

जाहिरात
0707

ऍसिडिटीचा त्रास प्राकृतिकरित्या माणसाचं शरीर ऍसिडीक असतं तर, माती प्राकृतिकरित्या अल्कलाईन असते. माठाचं पाणी प्यायल्याने शरीरात पीएच लेव्हल संतुलीत राहते. त्यामुळे ऍसिडीटी आणि पोटासंबंधी आजार कमी होतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या