JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोना काळात मुलांना या डोळ्याच्या आजाराचा धोका; ऐका तज्ज्ञांचा सल्ला

कोरोना काळात मुलांना या डोळ्याच्या आजाराचा धोका; ऐका तज्ज्ञांचा सल्ला

मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. स्लीप डिसऑर्डर (Sleep disorder) बरोबरच दृष्टीही कमजोर होते आहे. कशी ओळखायची या Myopia आजाराची लक्षणं?

जाहिरात

डोळे सुकणं, डोळ्यांमध्ये सूज येणं, अस्पष्ट दिसणं, डोळे दुखणं, दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसणं, झोप न लागणं. ही मायोपियाची काही लक्षणं आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली,12 जुलै :  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत  (Third Wave Of Corona) मुलांना धोका वाढलेला असतानाच एक नवीन आजार डोकं वर काढत आहे. कोरोनामुळे प्रतिकार शक्ती  (Immunity) कमजोर झाल्यामुळे ब्लॅक फंगस (Black Fungus) इन्फेक्शनचा धोका वाढलेला आहे. अशा आजारांमुळे चिंता निर्माण झालेली असतानाच मायोपिया (Myopia) नावाचा आजार आता समोर आलेला आहे. एका रिपोर्टनुसार चीन आणि नेदरलँड सारख्या देशांमध्ये डोळ्यांमधील मायोपियाची तक्रार वाढलेली आहे. भारतामध्ये देखील मायोपिया सारखीच लक्षणं असणारा आजार दिसून आलेला आहे. तज्ज्ञांच्या मते कोरोना काळामध्ये मोठ्यांप्रमाणे लहान मुलांच्या डोळ्यांची निगा राखायला हवी. वेळीच लक्ष न दिल्यास नजरेवर परिणाम होऊ शकतो. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या **(All India Institute of Medical Sciences)**डॉक्टर राजेंद्र प्रसाद सेंटर फॉर ऑप्‍थेल्मिक सायन्सचे प्रोफेसर डॉक्टर अतुल कुमार यांच्यामध्ये भारतामध्ये पूर्वीच्या तुलनेत सध्याच्या काळात मायोपियाची तक्रार वाढलेली आहे. कोरानामुळे लॉकडाऊन (Lockdown) असल्याने घरात अडकून पडलेले लोक डिव्हाइसेसचा वापर जास्त करू लागलेले आहेत. ऑनलाईन मीटिंग, शाळेसाठी मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर जास्त होत आहे. ( स्मार्टफोनने करा TV कंट्रोल; Google लवकरच आणणार नवीन फिचर ) प्रोफेसर अतुल यांच्यामते सतत एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करुन पाहत राहिल्यामुळे मायोपियाचा त्रास होतो. हळूहळू नजर कमजोर होत जाऊन दूरची दृष्टी कमी होते. डोळ्यामधून रक्त येणं किंवा आंधळेपणा असे त्रास देखील होऊ शकतात. कोरोनाकाळात मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन अभ्यासाकरता मोबाईल,लॅपटॉप किंवा कम्प्युटरचा वापर केला जातोय. याशिवाय मुलं घरामध्येच अडकलेली असल्यामुळे इंनडोअर ऍक्टिव्हिटी वाढलेल्या आहेत. त्याकरता देखील मुलं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करतात. सतत एका ठिकाणी नजर ठेवून पाहिल्यामुळे मायोपिया व्हायला लागलेला आहे. ( पालकांनो जपा आपल्या लहानग्यांना!कोरोनामुळे होतोय मुलांच्या मेंदूवर परिणाम;ऐका तज ) मायोपियाची लक्षणं डोळे सुकणं, डोळ्यांमध्ये सूज येणं, अस्पष्ट दिसणं, डोळे दुखणं, दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसणं, झोप न लागणं. ही मायोपियाची काही लक्षणं आहेत. ( पुदीन्यामुळे पचनशक्ती सुधारण्याबरोबर झटपट weight loss; जाणून घ्या खाण्याची पद्धत ) ब्ल्यू लाईटमुळे झोप कमी येते इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या जास्त वापरामुळे डोळ्यांवर खुप वाईट परिणाम होतात. मोबाईल फोन,टीव्ही,कम्प्युटर,लॅपटॉप यासारख्या उपकरणांमधून निघणाऱ्या ब्लू लाईट डोळ्यांवरती परिणाम करतात. यामुळे डोळे सुकतात आणि मुलांची झोपही कमी होते. बरीच मुलं संध्याकाळी किंवा रात्री झोपण्याआधी फोन वापरतात. अशा मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत स्लीप डिसऑर्डर बरोबरच दृष्टीही कमजोर होती आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या