जेवणानंतर फळं खाल्ल्यास त्याचा चुकीचा परिणाम शरीरावरती होतो. फळ चावून खवीत त्यातील फायबर्सने पोट चांगलं राहतं. त्यामुळे आरोग्याला लाभ मिळतात मात्र, फळांचा रस प्यायला आवडत असेल तर, त्यामध्ये साखरेचा वापर करू नये.
नवी दिल्ली, 1 जुलै : त्वचा सुंदर असावी असं सगळ्यांनाच वाटतं त्यासाठी किती काळजीतरी घेतो. आहारापासून (Diet) कॉस्मेटिक्सपर्यंत किंवा होम रेमेडीज (Home Remedies) देखील ट्राय करतो. मात्र, चांगल्या त्वचेसाठी हायड्रेशन**(Hydration)**महत्वाचं असतं. आपल्या त्वचेमध्ये जेवढा ओलावा असेल तेवढीच त्वचा स्वच्छ आणि सुंदर राहते. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी लिक्वीड डाएट (Liquid Diet) घेण्याचा सल्ला देखील दिला जातो. त्वचा हायड्रेट करण्यासाठी भरपूर पाणी पिण्यापेक्षा लिक्वीड डाएटनेही फायदा होतो. मात्र, यामुळेच त्वचा खराब होऊन वेळेआधीच आपण म्हातारे दिसायला लागतो. त्वचा चांगली करण्याच्या नादामध्ये त्वचेवर वाईट परिणाम **(Side Effect on Skin)**होऊ शकतो. लिक्वीड डाएटमुळे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरामधून पाणी बाहेर निघून जातं. घाम किंवा युरीनच्या रूपांमध्ये हे पाणी बाहेर पडतं आणि याच रासायनिक प्रक्रियेदरम्यान शरीरातील पाण्याचं बाष्पीभवन होत राहतं. त्यामुळे त्वचा कोरडी पडायला लागते. त्वचेच्या आतील आणि बाहेरील सेल्स डेट व्हायला लागतात. ( हे चणे आहेत ‘Super Food’; डायबेटीज आणि वजन येईल नियंत्रणात ) त्यामुळेच चहा,कॉफी,सॉफ्टड्रिंक आणि अल्कोहोल हे चार पदार्थ लिक्विड डाएट म्हणून न घेण्याचा सल्ला कुणी दिला असेल तर, तो मुळीच वापरू नका. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असतं तर, सॉफ्ट ड्रिंकमध्ये वापरण्यात येणारे प्रिझर्वेटिव्ह देखील त्वचेला नुकसानदायक असतात. लिक्वीड डाएटचा परिणाम या चारही ड्रिंकमुळे आपल्या शरीरामध्ये बॅड कॅपिलरीज वाढायला लागतात. ज्यामुळे त्वचा रुक्ष व्हायला लागते. कॅपिलरीज आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्त, ऑक्सिजन आणि पाणी पोहोचवण्याचं काम करतात. शरीरातील आर्टरीज आणि त्वचा यांच्यामध्ये कॅपिलरीज काम करत असता. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. चहा,कॉफी,कोल्ड्रिंग किंवा मद्य यासारख्या पदार्थ आपल्या शरीरामध्ये पोहोचल्यानंतर आर्टरीजपर्यंत पोहोचता आणि याचा परिणाम स्वरूप त्यांचा आकार कमी होतो. ( तुमच्या ‘या’ चुकांमुळे होते बद्धकोष्ठता; आधी बदला सवयी ) त्यानंतर पेशीमध्ये रक्त ऑक्सिजन पोषकतत्व आणि पाणी यांचा पुरवठा अतिशय कमी होत जातो. ज्यामुळे त्वचा कोरडी पडायला लागते. योग्य लिक्विड डाएट लिक्विड डाएट म्हणून चहा-कॉफी सोडा यांसारखे पदार्थ त्वचेवर वाईट परिणाम करतातच मात्र, लिक्विड डाएट म्हणून ग्रीन टी पिऊ शकता. याशिवाय गोल्डन मिल्क, फळांचा सर घेतला तर फायदाच मिळेल. ( Pregnancy मध्ये कोरोनाचा धोका वाढला! 2 दिवसांचा गर्भही कोविड पॉझिटिव्ह ) आठवड्यातले 2 दिवस गोल्डन दूध फळं आणि ग्रीन टी प्यायल्यास आपल्या त्वचेवर याचा लगेच परिणाम दिसायला लागतो. आपली त्वचा हायड्रेट होते. सीबम कमी होतात. ज्यामुळे त्वचा तेलकट होत नाही. स्क्रीनचा पीएच बॅलन्स होतो. यामुळे त्वचेचा रुक्षपणा कमी होतो. स्किन रिपेरिंग स्पीड वाढतो.