JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Haunted Park : कधीकाळी गर्दीने भरलेलं असायचं हे थीम पार्क; आता शुकशुकाटातही ऐकू येतात विचित्र आवाज, गूढ कायम!

Haunted Park : कधीकाळी गर्दीने भरलेलं असायचं हे थीम पार्क; आता शुकशुकाटातही ऐकू येतात विचित्र आवाज, गूढ कायम!

एके काळी अमेरिकेतल्या या प्रसिद्ध थीम पार्कमध्ये लहान मुलांचं बागडणं, तरुणाईचा हल्लागुल्ला, गप्पा ऐकू यायच्या. गर्दीने बहरलेलं हे पार्क आता ओस पडलंय आणि चित्रविचित्र आवाज इथे ऐकू येतात म्हणे. अमेरिकेतली Most Haunted Place असं या बंद पडलेल्या पार्कचं वर्णन केलं जातं. नेमकं असं काय घडलं होतं तिथे? पाहा PHOTOS

0106

अमेरिकेतलं six flags amusement park हे एके काळी प्रसिद्ध थीम पार्क होतं. 146 एकर जागेत पसरलेलं हे पार्क म्हणजे आनंद जत्रा होती. आता मात्र हे पार्क बंद पडलंय. या झपाटलेल्या ठिकाणी येण्यास लोक घाबरतात.

जाहिरात
0206

2005 मध्ये आलेल्या कॅटरिना चक्रीवादळाने (Hurricane Katrina) या थीम पार्कचा पूर्णपणे विनाश केला. तेव्हापासून हे उद्यान बंद आहे. या घटनेला 16 वर्षं झाली आहेत. तरीदेखील त्या दुर्दैवी घटनेच्या पाऊलखुणा अजूनही तशाच आहेत.

जाहिरात
0306

जेव्हा वादळ आलं तेव्हा या उद्यानात हजारो लोक आनंदाने बागडत होती. या चक्रीवादळात 1800 लोकांना आपला जीव गमवावा लागला. न्यू ऑर्लियॉन्स परिसरात 4 लाखांहून अधिक लोक बेघर व्हावं लागलं.

जाहिरात
0406

आता या उद्यानाची गणना जगातील सर्वाधिक झपाटलेल्या उद्यानांमध्ये केली जाते. असे म्हटलं जातं की, वादळात मरण पावलेल्यांचा आत्मा इथं भटकत असतो. जो कोणी इथे येतो त्याला नेहमी वाटतं की कोणीतरी त्याला बघत आहे. लोकांनी अनेकदा या ठिकाणाहून विचित्र आवाज ऐकले असल्याचं सांगितलं जातं.

जाहिरात
0506

जेव्हा या ठिकाणी वादळ आलं होतं तेव्हा या पार्कचं अतोनात नुकसान झालं होतं. सगळे गेम, खेळणी उखडली गेली. वादळामध्ये जीव गमावलेल्यांच्या खाणाखुणाही इथे आहेत. मळलेली टेडी बेअर, तुटलेली मूर्ती, वादळात नष्ट झालेल्या साहित्यांचे तुकडे पाहून एखाद्याचा आत्मा थरथरेल. असंच चित्र सध्या या पार्कमध्ये आहे.

जाहिरात
0606

लोकांना या पार्कमध्ये अनेक विचित्र अनुभव आलेले आहेत. त्यामुळे हे पार्क अद्याप बंदच आहे. वादळानंतरची इथली शांतता कुणालाही घाबरवू शकते. (All Photo Credit- The Sun)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या