मुंबई, 29 जून: फर्स्ट टेक 2021 (First Take 2021) या आपल्या वार्षिक शोसाठी अबीर इंडिया फाउंडेशनने (Abir India Foundation) तरुण भारतीय कलाकारांकडून (Young India Artists) प्रवेशिका मागवल्या आहेत. त्या संस्थेच्या या शोचा हा पाचवा भाग आहे. यासाठी 25 जुलै 2021 पर्यंत प्रवेशिका पाठवता येणार आहेत. नामवंत परीक्षक मंडळाकडून (Eminent Jury Panel) निवडल्या गेलेल्या 10 सर्वोत्तम कलाकृतींना कार्यक्रमात गौरवलं जाणार आहे. कलाकारांनी abirindia.org या वेबसाइटवर जाऊन याबद्दलची सविस्तर माहिती, तसंच प्रवेशिका पाठवण्यासाठीचे निकष आदींची माहिती घ्यावी. गेल्या चार भागांमध्ये मिळून अबीर इंडिया संस्थेला 8000हून अधिक कलाकारांच्या (Artists) प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यापैकी 500 कलाकारांच्या प्रवेशिका निवडण्यात आल्या आणि त्यापैकी 32 कलाकारांना गौरवण्यात आलं. आतापर्यंत देशभरातल्या 473 पिनकोड्सवरून संस्थेला प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. कूचबिहार, गुलबर्गा, यवतमाळ, इम्फाळ, सिलिगुडी, मडगाव अशा देशाच्या वेगवेगळ्या भागांतल्या ठिकाणांवरच्या कलाकारांनी यात सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाच्या आतापर्यंतच्या भागांमध्ये मल्लिका साराभाई, वृंदा मिलर, सुबोध केरकर, वीर मुन्शी, मुझफ्फर अली, सीमा कोहली अशा अनेक मान्यवरांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं आहे. ‘स्पर्धेसाठी आलेल्या कलाकृतींचा दर्जा इतका उत्तम होता, की त्यातल्या अनेक कलाकृती स्वतःच विकत घेण्याचा मोह मला होत होता,’ अशी भावना गोव्यातील ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार सुबोध केरकर यांनी व्यक्त केली होती. हे वाचा- Chanakya Niti : फसवे मित्र घालतील खड्ड्यात; मैत्री करताना हे लक्षात ठेवा चित्रकला (Painting), शिल्पकला (Sculpture), सिरॅमिक (Ceramic), मिक्स्ड मीडिया (Mixed Media), प्रिंट्स (Prints) अशा विविध भागांत कलाकारांनी प्रवेशिका (Entries) सादर केल्या आहेत. या सगळ्यातून रंगांचा उत्सव साजरा झाला आणि तरुणांच्या उत्फुल्लतेच्या लहरी पसरल्या. जग आता एका महासाथीतून बाहेर येत असतानाच्या टप्प्यावर ‘फर्स्ट टेक 2021’ हा कार्यक्रम अबीर इंडियातर्फे सादर केला जाणार आहे. व्यापक पातळीवर होणार असलेल्या या दर्जेदार कार्यक्रमामुळे तरुण कलाकारांमधल्या उत्साहाला पुन्हा ऊर्जा मिळेल आणि कलेच्या क्षेत्राच्या आशेचे नवे किरण पसरू शकतील. हे वाचा- जास्त पगार की घरात मदत काय हवं? बायकोनेच ठरवावं आता काय हवं अबीर इंडिया (Abir India) हे अहमदाबादमधलं ना-नफा तत्त्वावर चालणारं फाउंडेशन आहे. चित्रकार, डिझायनर आणि नॅचरल डाय एक्स्पर्ट असलेल्या रुबी जागृत (Ruby Jagrut) यांनी 2016 साली या फाउंडेशनची स्थापना केली. तरुण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे फाउंडेशन कटिबद्ध असून, जिथे उत्तम कलाकार नव्याने पंख पसरून झेप घेतात अशा उत्सवात त्याचं रूपांतर झालं आहे. कलाकारांना मदत करणं हे संस्थेचं मूलभूत उद्दिष्ट आहे. कलाकारांना आधाराचा हात तर ही संस्था देतेच, पण गुणग्राही कलातज्ज्ञांमध्ये चर्चाही घडवून आणते. या कार्यक्रमामधून अनेक गाठी-भेटी, चर्चा होतात, माहितीची देवाणघेवाण होते. त्यामुळे कलाकारांना त्यांचं क्षितिज विस्तारण्यास मदत होते. अधिक माहितीसाठी संपर्क : हेली पटेल, मोबाइल : 9099506989 ई-मेल : office@abirspace.com