JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Feng Shui Tips : वैवाहिक आयुष्याला आनंदी बनवायचंय? मग वापरा या काही टिप्स

Feng Shui Tips : वैवाहिक आयुष्याला आनंदी बनवायचंय? मग वापरा या काही टिप्स

आपल्या वैवाहिक आयुष्यात नेहमी चढ -उतार येतात. आपल्या पार्टनरबरोबरचे वाद जेव्हा टोकाला पोहचतात तेव्हा आपल्याला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात सुख आणि आनंद मिळवण्यासाठी काय करायला हवं, याविषयी चीनी वास्तुशास्त्र फेंगशुईत याबाबत काय म्हटलं गेलं आहे. पाहा PHOTOS

0106

Feng Shui वास्तुशास्त्रानूसार विवाहित जोडप्यासाठी बेडरूम हे योग्य दिशेने असणं खूप महत्वाचं आहे. बेडरूमसाठी दक्षिण-पश्चिम दिशा सर्वोत्तम मानली जाते. ईशान्येकडील बेडरुममध्ये दीर्घकाळ झोपणे मानसिक आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरू शकते.

जाहिरात
0206

त्याचबरोबर या वास्तूशास्त्रानुसार विवाहित जोडप्यांनी आपल्या बेडरूममध्ये पाण्याच्या कारंज्या किंवा इतर सजावटीच्या सामानात पाणी असायला नको. कारण ते आपल्या वैवाहिक आयुष्याला धोकादायक असते.

जाहिरात
0306

जर तुमच्या बेडरूममध्ये जागा असेल तर लक्षात ठेवा की बेडच्या वर कोणताही पंखा असू नये. झोपताना आपलं डोकं उत्तरेकडे ठेवून झोपू नये. जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्हाला निद्रानाश होण्याची होण्याची शक्यता असते.

जाहिरात
0406

फेंगशुई वास्तुशास्त्रानूसार बेडरूममध्ये सुगंधी मेणबत्त्या ठेवायला हव्या. बेडरूममध्ये अशा कोणत्याही विचित्र गोष्टी असायला नको. नद्या, तलाव, धबधबे यांची चित्रे बेडरूममध्येही नसावीत. त्याचबरोबर देव देवतांचेही फोटो घरात लावू नये.

जाहिरात
0506

आपल्या बेडरूममध्ये सतत प्रकाश असायला हवा. दिवस असेल तर सुर्यप्रकाश अथवा लाईटचा प्रकाश असेल तर आपले वैवाहिक जीवन सुखकर होते.

जाहिरात
0606

विवाहित जोडप्यांनी बेडरूममध्ये दरवाज्याकडे पाय करून झोपू नये. त्याचबरोबर पलंगाच्या दोन्ही बाजूला पेपरची रद्दी किंवा आरसा ठेऊ नये.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या