JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Fashion Tips: उंच आणि सुंदर मुलींनो, आकर्षक दिसण्यासाठी ट्राय करा दिशा पटानीचे हे लुक्स

Fashion Tips: उंच आणि सुंदर मुलींनो, आकर्षक दिसण्यासाठी ट्राय करा दिशा पटानीचे हे लुक्स

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये खूप दिसत आहे. ‘एमएस धोनी’ सारख्या हिट चित्रपटात काम करणारी दिशा, अभिनयासोबतच तिच्या चांगल्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते आणि चाहत्यांनाही तिची स्टाइल खूप आवडते. जर तुम्ही तिच्या फॅशन सेन्सने प्रभावित असाल आणि तुम्ही तिच्यासारखे उंच असाल, तर तुम्ही येथे दिलेले तिचे काही ड्रेस कलेक्शन ट्राय करू शकता.

0105

सध्या मुलींमध्ये फ्लोरल प्रिंट खूप लोकप्रिय होत आहे. जर तुम्ही उंच असाल आणि पार्टीला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हा प्रकार वापरून पहा. साध्या सँडल्स ड्रेससोबत छान दिसतील. Image : Instagramdishapatani

जाहिरात
0205

तुम्हाला सोबर ड्रेस हवा असेल तर दिशा पटानीचा हा साधा पांढरा ड्रेस तुम्ही ट्राय करू शकता. ग्लॅडिएटर डिझाईनच्या सँडल आणि या ड्रेसमुळे तुमचा लुक आणखी सुंदर होईल. Image : Instagramdishapatani

जाहिरात
0305

तुम्हाला जर पार्ट्यांमध्ये बोल्ड आणि क्लासी स्टाईलचे कपडे घालायला आवडत असतील तर दिशा पटानीचा हा पांढरा चमकदार पँट सूट तुम्ही ट्राय करू शकता. हा ड्रेस आणि अशी हेअरस्टाईल उंच मुलींवर खूप छान दिसेल. Image : Instagramdishapatani

जाहिरात
0405

जर तुम्हाला कूल लुकसह स्टायलिश दिसायचे असेल तर दिशा पटानीसारख्या डेनिम बॉयफ्रेंड पँटसोबत ऑफ शोल्डर ब्लॅक टॉप वापरून पहा. डिझायनर बेल्ट सोबत घेऊन तुम्ही तुमचा लूकही बोल्ड करू शकता. Image : Instagramdishapatani

जाहिरात
0505

दिशा पटानी या लूकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. येथे तिने क्यूट क्रॉप टॉप आणि लेदर जीन्स स्टाईल केली आहे. तुमची उंची ठळकपणे दाखवण्यासाठी तुम्हीही अशा प्रकारचे कपडे ट्राय करू शकता. Image : Instagramdishapatani

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या