EID 2021 : अगदी कुर्त्यापासून ते साडीपर्यंत तुम्हाला जे आवडतं तो अभिनेत्रींचा लुक तुम्हाला इथं पाहायला मिळेल.
ईदला नक्की काय घालायचं यावर आता अनेक जण विचार करत असतील. विशेषतः महिला आपल्या लुकबाबत खूपच उत्साही असतात. तेव्हा हे लुक्स नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील.
तुम्ही हिना खानसारखा असा लुक कॅरी करू शकता. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हिना अतिशय सुंदर दिसत आहे. तर तिने आकर्षक ज्वेलरीही परिधान केली आहे.
सोनाक्षी सिन्हासारखा शराराही तुम्ही घालू शकता. या ड्रेसमध्ये सोनाक्षी अतिशय आकर्षक दिसत आहे. या ड्रेसवर तिने सुंदर चोकर नेकपिसही घातला आहे.
तुम्ही कुर्ता घालायचं ठरवलं असेल तर आमना शरिफच्या या कुर्त्याबाबत काय म्हणाल? आवडला असेल तर तुम्हीही असाच कुर्ता घाला.
तुमची फेव्हरेट अभिनेत्री क्रिती सेनन असेल आणि तिच्या लुकला तुम्ही फॉलो करत असाल तर मह तिच्यासारखा हा सुंदर लेहेंगा घाला.
ना तुम्हाला ड्रेस, कुर्ता, लेहंगा चोली, शरारा घालायचा असेल आणि अगदी सुंदर साडी हवी असेल तर मग कतरिना कैफसारखी चंदेरी रंगाची सुंदर साडीही नेसू शकता.