JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चाळीशीनंतरही राहायचं आहे Fit and Fine; पुरुषांसाठी खास Diet plan

चाळीशीनंतरही राहायचं आहे Fit and Fine; पुरुषांसाठी खास Diet plan

चाळीशीनंतर महिलांप्रमाणेच पुरुषांनीही आपलं आरोग्य (Health after age of 40) जपायला हवं.

जाहिरात

डायटिंग करणाऱ्यांनी खजूर नक्की खावेत. त्यातील फायबरमुळे पोट भरतं आणि यातील फ्रुक्टोज आणि ग्लूकोज आपल्या शरीराची उर्जा वाढवण्यास मदत करतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 मे : एका विशिष्ट वयानंतर आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवू लागतात. यात प्रामुख्याने मधुमेह, वाढते वजन, पचनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होणं यांचा समावेश होतो. या वयानंतर हृदयासंबंधी विकार जडण्याची शक्यता असते. पण वाढत्या वयातील आरोग्य म्हटलं की फक्त महिलांच्या आरोग्याचा विचार केला जातो. पण महिलांप्रमाणेच पुरुषांनीही (Men health) आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. विशेषतः चाळीशीनंतर महिलांप्रमाणेच पुरुषांनीही आपलं आरोग्य (Health after age of 40) जपायला हवं. कोरोना काळात स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवण्याचं महत्त्व समजलं आहे. शरीर फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी चांगली जीवनशैली (LifeStyle) आणि पोषक आहार (Healthy Diet) या बाबी महत्त्वाच्या आहेत. जर तुमचं वय 40 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला तुमच्या आहार आणि आरोग्याकडे लक्षं देणं आवश्यक आहे. 40 वर्षांवरील पुरुषांनी स्वतःला फिट ठेवण्यासाठी काही गोष्टी ध्यानात घेणं आवश्यक आहे. हे वाचा -  उन्हाळ्याच्या प्रत्येक समस्येवर रामबाण असं ‘या’ फळाचं एक ग्लास सरबत चाळीशीनंतर तुम्ही तुमच्या जीवनशैली आणि आहारात काही बदल केले तर तुम्ही नक्की फिट राहू शकता. त्यामुळे जाणून घेऊया वयाच्या चाळीशीनंतरही फिट राहण्यासाठी आहार कसा असावा. वय वर्षे 40 नंतर असा असावा पुरुषांचा डाएट प्लॅन शरीर हायड्रेटेड ठेवा शरीर फिट ठेवण्यासाठी हायड्रेटेड (Hydrate) राहणं आवश्यक आहे. त्यासाठी दिवसभरात किमान 3 लीटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. साध्या पाण्यासह तुम्ही नारळपाणी, ज्यूस किंवा हर्बल टीचे सेवन करू शकता. पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करतं. फायबर युक्त म्हणजेच तंतुमय पदार्थांचं सेवन करा तंतुमय पदार्थ (Fiber) शरीरासाठी फायदेशीर असतात. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. या पदार्थांच्या सेवनामुळे वजन आटोक्यात राहते. यासाठी तुम्ही आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. फायबरमुळे कोलेस्ट्रॉल पातळी आणि ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतं. यासाठी आहारात ब्रोकोली, कोबी, अक्रोड, कडधान्य, ग्रीन टी आणि बेरीचा समावेश करावा. या पदार्थांमध्ये ओमेगा 3 (Omega3Fats) देखील असतं. यामुळे कॅन्सरचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. चांगलं फॅट आवश्यक आपल्या आहारात चांगल्या फॅटचा (Good Fats) समावेश असलेले म्हणजेच नासपती, ऑलिव्हज, शेंगदाणे, कडधान्य आणि कोल्ड प्रेस्ड ऑईल यांचा समावेश करावा. यामध्ये चांगले फॅटस पुरेशा प्रमाणात असतात. हे पदार्थ तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. हे वाचा -  विसरा फ्रीज; उन्हाळ्यात प्या फक्त माठातलं पाणी; पुरुषांसाठी ठरेल जास्त फायदेशीर संपूर्ण दाणेदार धान्य खा या धान्यात प्रामुख्याने ओटस, दलिया, लाल तांदूळ यांचा समावेश होतो. हे धान्य सेवन केल्यास दिवसभर तुम्हाला चांगली ऊर्जा मिळू शकते. तसंच या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी देखील असते. जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. प्रोटीन आहेत आवश्यक आपल्या आहारात सोयामिल, सोया टोफू या प्लांट बेस्ड प्रोटीनचा समावेश करावा. त्या व्यतिरिक्त मटण, चिकन, अंडी, मासे किंवा सुकामेवा जरूर सेवन करा. मात्र वजन लक्षात घेऊन हे पदार्थ सेवन करणं हिताचं ठरेल. या गोष्टींपासून दूर रहा फ्राईड आणि पॅकेज्ड फूड पासून दूर रहा. कारण या पदार्थांच्या सेवनानं कोलेस्ट्रॉल आणि बीपीची समस्या निर्माण होते. तसंच धूम्रपान आणि मद्यसेवन पूर्णपणे बंद करा. कारण यामुळे कॅन्सर तसंच लिव्हरशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या