नवी दिल्ली, 3 मे: सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधित रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स आणि औषधांचा तुटवडा जाणवत असून एकूणच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे. दुसरीकडे या संसर्गापासून आपला बचाव व्हावा, यासाठी लोक आपल्या आहार विहारामध्ये बदल करताना दिसत आहेत. कोरोना काळात दररोज अंडी (Eggs useful for immunity during covid-19) खा, प्रोटीन्स खा असं आवर्जून सांगितलं जात आहे. त्यात किती तथ्य आहे, किती आणि कशी खायला हवीत अंडी? या संपूर्ण साथीच्या काळात इम्युनिटी (Immunity) किंवा प्रतिकारशक्ती हा शब्द सर्वांच्या तोंडी आहे. इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी (Eggs) खाण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, अंडी खाताना आपल्याला खूप गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जर अंडी गुणकारी ठरली नाहीत तर त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंडी नेमकी किती, कशी खावीत याबाबत जाणून घेऊ या. प्रोटिनचा प्रमुख स्त्रोत अंडी अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन (Protein)असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन डी, ए, B12 आणि सेलेनियमचा स्त्रोत म्हणून अंडी खाल्ली जातात. त्यामुळे अंडी खाल्लाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते यात शंका नाही. पण हे करताना काय काळजी घ्यायची? अशा प्रकारे अंड्याचे सेवन अजिबात करू नका अशिया नेट न्यूजच्या वृत्तानुसार, कोरोना काळात न शिजवता अंडी खाणं चांगलं नाही. अनेकदा लोक कच्चं अंड फोडून त्यातील बल्क तसाच खातात. मात्र अशा प्रकारे अंड्याचं सेवन करणं शरीरासाठी घातक असतं. कच्च्या अंड्यात अनेक भागात प्रोटीन विखुरलेलं असतं. त्याची निर्मिती अशा प्रकारे होते की ते एकमेकांमध्ये मिसळलं जाऊ शकत नाही. अशा प्रकारे करा अंड्याचा आहारात समावेश जर तुम्ही कोरोनापासून बचाव व्हावा या उद्देशाने अंड्याचे सेवन करु इच्छित असाल तर ते उकडून खावे. तसेच कमी तेलात आम्लेट बनवून किंवा निम्मे शिजवून सेवन केलं तरी चालू शकतं. या रुग्णांनी खाऊ नये अंड्याचा बलक एका अंड्यात सुमारे 373 मिग्रा कोलेस्ट्रॉल (Cholesterol) असते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही व्यक्तीने एका दिवसांत केवळ 300 मिग्रॅ कोलेस्ट्रॉल सेवन करणं योग्य आहे. सावधान! कोरोना निदानासाठी CT-SCAN करताय? डॉक्टरांनी सांगितला काय आहे धोका ज्या व्यक्तींना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे अशा व्यक्तींनी अंड्यातील पिवळे बलक खाणे टाळावे. अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोटिन अधिक आणि कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असतं. एका दिवसात 2 ते 3 अंडी सेवन करा अंडी पौष्टीक असतात याचा अर्थ असा नाही बेसुमार अंडी खावीत. एका निरोगी व्यक्तीने 1 दिवसांत 2 ते 3 अंडी खावीत. Coronavirus ला मारून टाकणारा ड्रग मॉलिक्यूल सापडला; टेक महिंद्र करणार पेटंट अर्ज ज्या व्यक्तींना मधुमेह किंवा ह्दयविकाराचा त्रास आहे त्यांनी फक्त 1 अंड प्रतिदिन सेवन करावं. लहान मुलांना ही अंडी खायला द्यावी लहान मुलांनाही एका विशिष्ट वयानंतर अंडे खाऊ घालावे. 8 महिन्याच्या बाळाच्या आहारात अंड्याचा समावेश केला तरी चालतो. मात्र अंड्यातील पांढरा भाग 1 वर्ष वयानंतरच मुलांना द्यावा. मायक्रोवेव्हमध्ये अंडी शिजवू नका अंडी शिजवण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा (Microwave)वापर करु नये. अंडी जास्त वेळ उकळवली किंवा फ्राय केली तर त्यातील अन्टी आक्सिडंट घटक कमी होतात. अशी स्टोअर करा अंडी जास्त उष्ण हवामान असेल तर अंडी लवकर खराब होतात. अशा वेळी तुम्ही अंडी फ्रिजमध्ये ठेवू शकता. कारण रुम टेम्परेचरमध्ये अंड्यात बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता जास्त असते.