JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / महाभयंकर कोरोनाची भीती वाढली, संक्रमणापासून वाचण्यासाठी करा हे उपाय

महाभयंकर कोरोनाची भीती वाढली, संक्रमणापासून वाचण्यासाठी करा हे उपाय

कोरोना व्हायरस (Coronavirus) अर्थात COVID-19 च्या संक्रमणामुळे जगभरात 3 हजार 131 माणसांचा मृत्यू झाला आहे. हा भयंकर व्हायरस राज्यातही पोहोचला आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. अशा वेळी वैयक्तिक पातळीवर काही खबरदारी घेणं आवश्यक आहे.

0110

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी कोणताही ठोस उपचार अद्याप शोधण्यात आलेला नाही. पण कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी काही प्राथमिक उपाय करणे आवश्यक आहे.

जाहिरात
0210

miami.cbslocal.com च्या माहितीनुसार कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी मास्कपेक्षा जास्त स्वच्छ पाण्याने हात धुणे हा प्रभावशाली उपाय आहे.

जाहिरात
0310

COVID-19 च्या संक्रमणापासून वाचण्यासाठी हात स्वच्छ पाणी आणि साबणाने धुणे आवश्यक आहे. कमीतकमी 20 सेकंद किंवा त्याहून जास्त वेळेसाठी हात साबण आणि पाण्याचा वापर करून धुणे अपेक्षित आहे.

जाहिरात
0410

जेवणाआधी, खोकल्यानंतर, नाक साफ केल्यानंतर हात स्वच्छ धुणे अत्यंत गरजेचं आहे.

जाहिरात
0510

हात साफ करताना अंगठा, मनगट आणि बोटांमधील जागा धुणं राहून गेल्यासे ते धोक्याचं ठरेल.

जाहिरात
0610

तुम्ही बाहेर असाल आणि साबण-पाण्याचा वापर अशक्य आहे, तर अशावेळी सॅनिटायझरचा वापर करा. सर्वात जास्त प्रभावी असणाऱ्या 60 टक्के अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरचा वापर करा.

जाहिरात
0710

व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी वारंवार तुमचे डोळे, नाक, तोंड आणि चेहऱ्याला स्पर्श करणं टाळा

जाहिरात
0810

जर तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमणाची लक्षणं दिसू लागली तर त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा

जाहिरात
0910

तुम्ही कोरोना व्हायरस संक्रमणाचे शिकार असाल तर घराबाहेर जाणं टाळा

जाहिरात
1010

खोकताना टिशू पेपरचा वापर करा आणि हा टिशू त्वरित कचराकुंडीत फेका. त्यांनतर हात स्वच्छ करा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या