JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / OMG! लहान मुलांना दिलं जातंय कोंबड्याच्या रक्ताचं इंजेक्शन; कोरोना संकटात चीनमध्ये विचित्र प्रयोग

OMG! लहान मुलांना दिलं जातंय कोंबड्याच्या रक्ताचं इंजेक्शन; कोरोना संकटात चीनमध्ये विचित्र प्रयोग

चीनमध्ये पालक आपल्या मुलांसाठी चिकन पॅरेंटिंगची (Chicken parenting) मदत घेत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 15 सप्टेंबर : एकिकडे कोरोनाचं थैमान आहे. लहान मुलांमध्येही कोरोनाचा वाढता धोका पाहतात त्यांना कोरोना लस देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काही देशांमध्ये लहान मुलांना कोरोना लस दिली जाते आहे. भारतातही लवकरच लहान मुलांचं कोरोना लसीकरण केलं जाणार आहे. अशात चीनमध्ये (China) मात्र लहान मुलांना चक्क कोंबड्याचं रक्त दिलं जातं आहे (Chicken blood injections to child) . चीनमधील पालक आपल्या मुलांना कोंबड्याच्या रक्ताचं इंजेक्शन (Chicken blood injections) देत आहे. चिनी पालक आपल्या मुलांना सुपरकिड (Super kid) बनवण्यासाठी चिकन पॅरेंटिंगची (Chicken parenting) मदत घेत आहेत. कोंबड्याच्या रक्ताच्या इंजेक्शनच्या फायद्याबाबत बरेच दावे केले जात आहे. यामुळे आरोग्य समस्या दूर राहतील आणि त्यांचं शरीर तंदुरूस्त होईल, असा दावा केला जात असल्याचं सिंगापूर पोस्टच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हे वाचा -  बाळासोबतच राहून फॅटची फिट झाली; प्रेग्नन्सीनंतर 4 महिन्यांतच घटवलं 13 किलो वजन रिपोर्टनुसार कोंबड्याच्या रक्ताचं इंजेक्शन घेतल्याने कॅन्सरपासून मुक्ती मिळते. टक्कल पडत नाही.  कोंबड्याच्या रक्तात स्टेरॉईड असतं, जे मुलांना अभ्यासात आणि खेळातही तरबेज बनवण्यात मदत करतं. चीनला त्यांच्या देशातील मुलं प्रत्येक क्षेत्रात पुढे हवी आहेत. पालकांमध्येही आता चिकन बेबीचा क्रेझ वाढतो आहे. बीजिंग, शंघाई आणि गुवांग्झूमध्ये याचं प्रमाण अधिक आहे.  अशा मुलांना इथं वेगळी ओळख मिळते आहे, ज्यामुळे इतर पालकही हे करण्यासाठी प्रोत्साहित होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या