JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Chanakya Niti: अशा लोकांसोबत कधीही वाद घालू नये; चाणक्य नीतीमध्ये सांगितलेय त्याचे कारण..

Chanakya Niti: अशा लोकांसोबत कधीही वाद घालू नये; चाणक्य नीतीमध्ये सांगितलेय त्याचे कारण..

Chanakya Niti: राग येणे हा अनेकांचा स्वभाव असतो. काहींना रागवायचे नसतानाही राग येतो. रागावलेले लोक सहसा जवळच्या व्यक्तींना वाईट बोलण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, राग शांत झाल्यानंतर त्यांनाही आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागतो. अशा परिस्थितीत चाणक्य नीति आपल्यासाठी सर्वोत्तम मार्गदर्शक ठरू शकते. चाणक्याच्या धोरणानुसार, काही लोकांशी कधीही भांडण करू नये अन्यथा भविष्यात स्वत:लाच अपराधी वाटू शकते. चाणक्य नीतीच्या टिप्स वापरून आपण रागाचे दुष्परिणाम टाळू शकतो. आचार्य चाणक्य हे भारताचे प्रसिद्ध तत्वज्ञानी आणि अर्थशास्त्रज्ञ होते त्यांच्या नीतिशास्त्रानुसार, रागाच्या भरात काही लोकांशी कधीही भांडण करू नये. जाणून घेऊया कोणत्या लोकांशी भांडण टाळावे.

0104

नातेवाइकांशी भांडण करू नका : चाणक्य नीतीनुसार, जवळचे नातेवाईक अनेकदा आपलं चांगलं-वाईट समजून घेतात. म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यांशी भांडण करणे म्हणजे आपला एखादा हितचिंतक गमावण्यासारखे आहे. यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप तर होतोच पण भविष्यात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारे कुटुंबीयही तुमच्यापासून दूर जाऊ शकतात.

जाहिरात
0204

मुर्ख लोकांशी वाद घालू नका : आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख लोकांशी भांडण करणे म्हणजे दगडावर डोके आपटण्याचा प्रकार आहे. अशी माणसे आपले मत दुसऱ्याला सांगताना नेहमीच वाद घालू लागतात, त्यांच्याशी भांडण करून तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता आणि मूडही खराब करता. अशा परिस्थितीत मूर्ख लोकांशी वाद न केलेलाच बरा.

जाहिरात
0304

मित्रांशी भांडू नका : मैत्रीचे नाते हे जीवनातील खास नाते आहे. हसण्या-विनोद करण्यापासून गुपिते शेअर करण्यापर्यंत मैत्री आपल्याला प्रत्येक पावलावर साथ देते. काही वादातून आपला सर्वात चांगला मित्र गमावणं वाईट आहे. तुम्ही मित्रांशी भांडण करून तुमचा सर्वात चांगला मित्र गमावता आणि तुम्ही विश्वासार्ह नातेसंबंधापासून देखील दूर जाता आणि भविष्यात जेव्हा अडचणी उद्भवतात तेव्हा तुम्हाला तुमच्या कृतीबद्दल पश्चाताप होऊ लागतो.

जाहिरात
0404

शिक्षकाशी भांडू नका : प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. एक चांगला शिक्षक जीवनात तुमचा मार्गदर्शक ठरू शकतो. मात्र, काही लोक अनेकदा रागावतात आणि गुरूबद्दल वाईट बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत, परंतु असे केल्याने तुम्ही स्वतःला गुरूपासून तर दूरच घालवता पण ज्ञानापासून (सूचना : येथे दिलेली माहिती चाणक्य नीतीशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या