JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / चाणक्य नीती : कामात यश मिळवण्यासाठी एका ठराविक संख्येनुसारच करावीत ही 5 कामं

चाणक्य नीती : कामात यश मिळवण्यासाठी एका ठराविक संख्येनुसारच करावीत ही 5 कामं

जीवनात अनेकदा लाख प्रयत्नांनंतरही लोक काही कामात अपयशी ठरतात. ज्याचे एक कारण म्हणजे निर्धारित संख्या लक्षात न ठेवणे. होय, चाणक्य नीतीनुसार (Chanakya Niti), काही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी निश्चित संख्येच्या सूत्राचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. भारतीय इतिहासातील प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी अनेक उपाय दिलेले आहेत. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) लिहितात की, काही कामांमध्ये यश मिळवण्यासाठी निर्धारित संख्येकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. चला जाणून घेऊया कोणकोणत्या गोष्टी आहेत. ज्या विहित संख्येत केल्याने तुम्हाला यश मिळू शकते.

0105

अभ्यास : चाणक्य नीतीनुसार दोन व्यक्तींनी एकत्र अभ्यास (Study) करणे योग्य आहे. यामुळे अभ्यास करणे तर सोपे जातेच, पण तुम्ही कोणत्याही विषयात अडलात तर दुसरी व्यक्तीही तुम्हाला मदत करू शकते.

जाहिरात
0205

तपश्चर्या : आचार्य चाणक्य यांच्या मते, तपश्चर्याचे (Prayer) खरे फळ तेव्हाच मिळते जेव्हा व्यक्ती एकट्यानेच तपश्चर्या करते. चाणक्याच्या नीतीनुसार अनेक लोकांसोबत तपश्चर्या केल्याने मन अस्वस्थ होऊ लागते आणि तुमची तपश्चर्या कधीच सफल होत नाही.

जाहिरात
0305

मनोरंजन : आचार्य चाणक्य यांच्या मते, एकट्याने मनोरंजनाचा (Entertainment) आनंद घेणे हे एक कठीण काम आहे, त्यामुळे मनोरंजनाचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी किमान तीन लोकांसोबत असणे आवश्यक आहे. तीन लोकांच्या गटात बसून तुम्ही मनोरंजनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

जाहिरात
0405

शेती : चाणक्य नीतीनुसार, शेती (Farming) हा केवळ एक ते दोन लोकांना जमण्यासारखी नसते. उत्तम प्रकारे शेती करण्यासाठी अनेक लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. किमान पाच जणांनी शेती करणे बंधनकारक आहे.

जाहिरात
0505

युद्ध : सहसा युद्ध (Battle) लढण्यासाठी मोठ्या संख्येने सैनिकांची आवश्यकता असते. चाणक्य नीती म्हणते की युद्ध कोठेही आणि कोणतेही असो, परंतु प्रत्यक्षात प्रत्येक प्रकारचे युद्ध जिंकण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. सदरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या