आपल्याकडे सार्वजनिक गणेशोत्सवात जसे मोठमोठाले देखावे उभे केले जातात, तसं बंगालमध्ये दुर्गापूजेचे पेंडॉल किंवा मंडप असतात. कोलकात्यातील एका दुर्गापूजा मंडपाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहा
कोलकात्यातल्या दुर्गापूजेचा हा मंडप आहे 145 फूट उंचीचा. बुर्ज खलिफाची ही प्रतिकृती पाहायला खूप गर्दी होत आहे.
कोलकात्यातील सॉल्ट लेक सिटीच्या लेक टाऊन परिसरात दुबईच्या बुर्ज खलिफाच्या धर्तीवर बांधण्यात आलेला हा देखावा 250 पेक्षा अधिक कारागिरांनी तयार केला आहे. जवळपास साडेतीन महिने त्यांनी यासाठी कष्ट घेतले होते.
145 फूट उंच हा देखावा 6000 अक्रॅलिक शीटपासून तयार केला आहे. देशातली सगळ्यात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाची ही किती हुबेहूब प्रतिकृती आहे पाहा
या देखाव्याची चर्चा वाढल्याने गर्दीही वाढली. कोरोनाचे नियम धाब्यावर बसले. एवढ्या उंचीवरच्या लायटिंगमुळे विमानांच्या लँडिंगला अडचण येण्याचा मुद्दाही चर्चेत आला. पण अग्निशमन मंत्री सुजीत बोस यांनी आता काही तक्रार नसल्याचं सांगितलं आहे. लाइट्स कमी केल्याचं ते म्हणाले.