sugar control : शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं मधुमेही रुग्णांसाठी आव्हानात्मक काम असतं. तसेच शुगर वाढू नये म्हणूनही आपण आहाराकडे लक्ष द्यायला हवं. अनेकांना माहीत नसेल मात्र बेलाची पानं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. बेलाची पाने शुगर कंट्रोलसाठीही गुणकारी आहेत. बेलपान अँटीऑक्सीडेंट आणि पौष्टिक तत्वांनी समृद्ध आहे. विटामिन ए, विटामिन सी, रायबोफ्लोबिन, कॅल्शियम, पोटॅशियम, टिन, विटामिन बी 1, बी 6, बी 12 त्यामध्ये आहे. जाणून घेऊया बेलाची पाने खाण्याचे काय फायदे आहेत आणि शुगर कंट्रोलमध्ये त्याचा कसा (Sugar control) फायदा होतो.
बेल पाने खाण्याचे फायदे - बद्धकोष्ठतेमध्ये बेलाच्या हिरव्या पानांचा खूप उपयोग होतो. बद्धकोष्ठतेच्या समस्येमध्ये तुम्ही बेलची पाने हलके मीठ आणि मिरपूड घालून चघळू खावू शकता. यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.
पचनशक्ती वाढते - बेलाची पाने पोट साफ करण्यासाठीही उपयुक्त आहेत. यात रेचक गुणधर्म आहेत, जे पाचन तंत्र मजबूत करण्यास मदत करतात.
बेलाच्या पानांचा उपयोग - आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहणं आव्हानात्मक काम झालं आहे. वेगवेगळ्या आरोग्य समस्या निर्माण होत असतात.
यामध्ये मधुमेह, हृदयविकाराचा झटका, उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या गंभीर आजारांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत बेलाची पाने खाल्ल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)