JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / इथं 580 रुपये किलो मिळतंय Bachpan ka pyaar; खरेदीसाठी ग्राहकांची लागली रांग

इथं 580 रुपये किलो मिळतंय Bachpan ka pyaar; खरेदीसाठी ग्राहकांची लागली रांग

रक्षाबंधनच्या (Raksha bandha 2021) निमित्ताने दुकानात मिळतंय ‘बचपन का प्यार’चं गोड गिफ्ट

जाहिरात

इथं मिळतंय 'बचपन का प्यार' (फोटो सौजन्य - एएनआय)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सूरत, 21 ऑगस्ट : बचपन का प्यार (Bachpan ka pyaar) हे गाणं तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. एका छोट्याशा मुलामुळे  (Bachpan ka pyaar video)  हे गाणं प्रसिद्ध झालं. त्यानंतर त्यावर सोशल मीडियावर बरेच मीम्स, रिल्स व्हिडीओ व्हायरल झाले. तुम्हीसुद्धा या गाण्यावर तुमचा एखादा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला असेल. पण तुम्हाला खरंच हे बचपन का प्यार हवं आहे का? गुजरातमध्ये (Gujrat Bachpan ka pyaar)  चक्क बचपन का प्यार  (Bachpan ka pyaar sweet)  मिळतं आहे. सूरतच्या एका मिठाईच्या दुकानात बचपन का प्यार विकलं जातं आहे. 580 रुपये प्रति किलोने बचपन का प्यारची विक्री होते आहे (Bachpan ka pyaar mithai) . फोटो सौजन्य - एएनआय

फोटो सौजन्य - एएनआय

सूरतच्या 24 Carats दुकानात बचपन का प्यार ही मिठाई मिळते आहे. लहानपणीच्या आठवणी ताज्या होतील अशी ही खास मिठाई तयार करण्यात आली आहे. शिवाय सध्या बचपन का प्यार हे गाणंही चांगलंच चर्चेत आहे. त्यामुळेच या मिठाईचं नाव बचपन का प्यार असं ठेवण्यात आलं आहे. हे वाचा -  Raksha bandhan चं कोरोना वॉरिअर बहिणींना किती गोड गिफ्ट आहे पाहाच; ‘चितळे बंधू’चा VIDEO होतोय तुफान VIRAL या दुकानाच्या मालक राधा मिठाईवाला यांनी सांगितलं, “रक्षाबंधन आलं आहे. त्यामुळे बहीण-भावाच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करण्याच्या उद्देशाने आम्ही ही खास मिठाई तयार केली. या मिठाईचं नावच खास नाही तर चवही खास आहे. या मिठाईत बबलगम फ्लेव्हरचा वापर करण्यात आला आहे, जे याआधी लहान मुलांचं फेव्हरेट होतं. तिच चव आता परत देण्याचा हा प्रयत्न आहे, जेणेकरून सर्वांच्या आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होतील” हे वाचा -  देशातील पहिली ‘मांजरांची बाग’, गुण्यागोविंदानं राहतात 300 मांजरं, पाहा PHOTOs ही मिठाई चाखणाऱ्या एका ग्राहकाने एनएनआयशी बोलताना सांगितलं, आम्ही या दुकानात अनेक मिठाई पाहिल्या. पण बचपन का प्यार मिठाईकडे आमचं विशेष लक्ष गेलं. आम्ही ती मिठाई चाखली तेव्हा त्याची चव वेगळी वाटली. आम्ही लहानपणी बबलगम खायचो अगदी तशीच चव लागत होती. खरंच ही मिठाई खाऊन जणून काही आम्ही आमच्या बालपणातच गेलो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या