JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तिच्या Undergarments मुळे उद्ध्वस्त होईल माझा संसार; महिलेची तक्रार, पोलीसही चक्रावले

तिच्या Undergarments मुळे उद्ध्वस्त होईल माझा संसार; महिलेची तक्रार, पोलीसही चक्रावले

आपले अंडरगार्मेंट्स बाहेर सुकवणाऱ्या शेजारणीला अटक करण्याची मागणी महिलेने पोलिसांकडे केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेक्सिको, 15 सप्टेंबर : शेजाऱ्यांची (Neighbour Issues)  भांडणं नवी नाहीत. पाणी, कचरा अशी कितीतरी कारणं आहेत, अगदी छोट्या छोट्या कारणावरूनही ते भांडतात (Neighbour Fight). बहुतेक वेळा हा वाद पोलीस ठाण्यापर्यंतही पोहोचतो. असंच शेजाऱ्याचं भांडणं पोलीस ठाण्यापर्यंत गेलं. पण त्यांच्या भांडणाचं कारण आणि तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले.  बाहेर अंडरगार्मेंट सुकवते (Women Undergarments)  म्हणून तिला अटक करा, चक्क अशी मागणी करत एका महिलेने आपल्या शेजारणीविरोधात तक्रार दिली आहे. मेक्सिकोतील (Mexico) 42 वर्षांच्या युवित्ज़ाच्या (Yuvitza) शेजारी 23 वर्षांची तरुणी राहत होती. ती तिचे अंडरगार्मेंट्स बाहेर सुकवत होती म्हणून युवित्ज़ाला त्रास होत होता. तिने अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने काही ऐकलं नाही. शेवटी तिने शेजारणीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. तिने पोलिसांनाच कॉल करून, शेजारणीला अटक करून तिला जेलमध्ये टाकण्याची मागणी केली आहे. हे वाचा -  10 महिन्यांतच दोनदा प्रेग्नंट, 3 बाळांना जन्म; प्रेग्नन्सीमुळे डॉक्टरही चक्रावले द सनच्या रिपोर्टनुसार, महिलेचा आरोप आहे की, शेजारीण जाणूनबुजून आपले कपडे बाहेर सुकवते. माझा नवरा जेव्हा घरी असतो, त्याची सुट्टी असते तेव्हाच ती असं करते. जेणेकरून माझा नवरा तिच्याकडे आकर्षित होईल. शेजारणीला लगेच अटक करा नाही आपला संसार उद्धवस्त होईल, अशी मागणी तिने पोलिसांकडे केली आहे. आता नेमकी कारवाई करायची, हा वाद कसा सोडवायाच हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. कारण खुल्या ठिकाणी कपडे सुकवणे हा गुन्हा नाही. त्यामुळे त्यावर कायदेशीर कारवाई करू शकत नाही. हे वाचा -  OMG! चिमुकल्यांना देतायेत कोंबड्याचं रक्त; कोरोना संकटात चीनमध्ये विचित्र प्रयोग पोलिसांनी दोघींनाही आपसात बोलून वाद मिटवायला सांगितला. पण महिला शेजारणीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी हट्ट धरून बसली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या