आज आम्ही तुम्हाला झोपेच्या गरजेव्यतिरिक्त झोपेबद्दल काही आश्चर्यकारक तथ्ये (Amazing facts about sleep) सांगणार आहोत. यापैकी काही तुमच्यासाठी नवीन असतील. लोकांनी झोपेला फारसं गांभीर्यानं घेतलेलं नाही. परंतु, झोपेशी संबंधित या गोष्टी जाणून घेतल्यास ते खूप गंभीरपणे घेतील.
अनेक दैनंदिन कामं मानवासाठी खूप महत्त्वाची आहेत. स्वत:ची स्वच्छता, शरीराची काळजी आणि अशा अनेक गोष्टी. पण असं एक काम आहे, जे बरेच लोक हलक्यात घेतात. त्याकडे लक्ष देत नाहीत आणि काहींना तर तो वेळेचा अपव्यय आहे, असंही वाटतं. आपण 'झोपे'बद्दल बोलत आहोत. कमी झोपल्यानं इतर गोष्टींसाठी वेळ शिल्लक राहतो आणि माणूस अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो, असं अनेकांना म्हणताना तुम्ही ऐकलं असेल. पण झोप किती महत्त्वाची आहे, हे फार लोकांना कमी माहिती आहे. आज, झोपेच्या गरजेव्यतिरिक्त, आम्ही तुम्हाला झोपेबद्दल काही आश्चर्यकारक तथ्ये सांगणार आहोत (Amazing facts about sleep), जी तुमच्यासाठी बहुतेककरून नवीन असतील. (सर्व फोटो: Canva)
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश काळ झोपेत घालवते. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील हा एक मोठा भाग असतो, जो तो झोपण्यात (sleep facts) घालवतो. पण ही झोप आपल्या सर्वांच्या आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
ऑक्टोबर 2017 मध्ये, केंटकीच्या विट शॉ (Wyatt Shaw) यांनी 11 दिवस झोपून सर्वात जास्त काळ झोपण्याचा जागतिक विक्रम (Longest period of sleep) केला. हा एक विचित्र जागतिक विक्रम आहे, परंतु त्याहूनही विचित्र प्रकार 1859 मध्ये जन्मलेल्या एका मुलीच्या बाबतीत झाला होता, जी 9 वर्षे झोपली होती. मात्र, या स्थितीला 'झोप' म्हणायचं की नाही, हे शास्त्रज्ञांना कळू शकलेलं नाही.
झोपेत चालणं हा एक दुर्मिळ आजार आहे, असं तुम्हाला वाटेल. पण तसं नाही. सुमारे 15 टक्के लोक झोपेत चालतात. ज्यांना झोपेत चालण्याची सवय असते, अशा लोकांना हे बर्याच वेळा माहीत असतं. पण जे लोक एकटे झोपतात त्यांना मात्र स्वतःबद्दल हे माहीत नसतं.
स्वप्नं जवळजवळ प्रत्येकाला पडतात. पण, कधी तुमच्या लक्षात आलंय का, की, तुमची स्वप्नं रंगीत असतात की ती काळी-पांढरी (Black and white dreams) असतात? 11 टक्के लोकांना फक्त काळी-पांढरी स्वप्नं दिसतात.
बहुतेक लोक झोपेतून जागे झाल्यानंतर 5 मिनिटांत त्यांची 50% स्वप्नं विसरतात. याचा अर्थ असा की, जर तुम्ही तुमची स्वप्नं लिहून ठेवलीत किंवा झोपेतून उठल्याबरोबर लगेच ती कोणाशी तरी शेअर केलीत तरच तुम्हाला ती आठवू शकतात.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत झोपण्यामुळे वजन कमी होण्यास मदत (Sleep helps in reducing weight) होते. हो, हे खरं आहे. जर, तुमची झोप चांगली असेल तर, झोपल्याने भूक 45 टक्क्यांनी कमी होते आणि तुमचं वजन नियंत्रणात राहतं.