JOIN US
मराठी बातम्या / भारत-चीन / India-China Border Tension : 'ड्रॅगन'नं दिला धोका, लडाखच्या सीमेवर पुन्हा नवी खेळी

India-China Border Tension : 'ड्रॅगन'नं दिला धोका, लडाखच्या सीमेवर पुन्हा नवी खेळी

गलवान खोऱ्यातील संघर्षावर झालेल्या बैठकीनंतर चीननं धूळफेक करत नवीन चाल खेळली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लडाख, 25 जून : भारत-चीन यांच्यातील लडाखच्या सीमा रेषेवरून असणारा तणाव कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा ड्रॅगननं धोका दिला आहे. लडाखच्या सीमेवर चीन छुप्या पद्धतीनं नवीन चाल खेळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही देशांमधील वाढत जाणारा तणाव कमी कऱण्यासाठी वारंवार बैठका होत असतानाच आता चीननं मंसूबे आखण्याची तयारीत आहे. चीननं पुन्हा एकदा लडाखच्या सीमेवर आपलं सैन्य वाढवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लडाखच्या डेपसांग भागात चीनचे सैनिक आणि वाहानं वाढवल्याची माहिती मिळाली आहे. गलवान खोऱ्यातून सैन्य हटवण्याच्या झालेल्या निर्णयानंतर चीननं आता डेपसांगमध्ये सैन्य वाढवलं आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार 4 मे पासून चिनी सैन्य पूर्व लडाखच्या एलएसी प्रदेशात सैन्य क्षमता वाढवत होतं. तोफगोळे आणि शस्रास्त्रांसह 10 हजारहून अधिक सैनिक तैनात केले होते. पॅगोंग पासून गलवान खोऱ्यापर्यंत चीनच्या सैनिकांकडून अनेक हलचाली होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. भारत आणि चीनमधील सीमा संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या बैठकांमध्ये झालेला करार धुडकावून आपलं सैन्य वाढवत असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर डेपसांग भागात भारतीय सैन्यानंही आपली गस्त वाढवल्याची माहिती मिळाली आहे.चीनचे मंसूबे उधळून लावण्यासाठी भारतही सज्ज असल्याची माहिती मिळाली आहे. भारत-चीन सीमारेषेवरून झालेल्या करारात ड्रॅगर वारंवार धोका देत असल्याचं दिसत आहे. संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या