नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : भारतात सातत्यानं सीमारेषेवर आणि काश्मीरमध्ये कुरघोड्या करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि पाकिस्तान चीनला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचक इशारा दिला आहे. भारताच्या सार्वभौमत्वाचा आदर हा सर्वोच्च आहे. यासाठी सीमारेषेवर जवान आपल्या प्राणांची बाजी लावतात. सैनिक आणि भारत काय करू शकतो हे लडाखमधील घटनेत जगानं पाहिलं आहे. एलओसीपासून ते एलएसीपर्यंत ज्यानेही देशाच्या, सार्वभौमत्वावर आणि देशाकडे वाकड्या नजरेनं पाहिले त्याला भारतीय सैन्यानं त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्त दिलं, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणात सांगितलं. स्वातंत्र्य दिनाच्या एकदिवस आधी श्रीनगरमध्ये दहशवादी हल्ला झाला होता. यामध्ये दोन जवान शहीद तर 3 जवान जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यामागील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हे वाचा- PM मोदींनी मोडला अटलजींचा रेकॉर्ड, पाहा लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाचे खास PHOTOS कोरोनाच्या लशीबाबत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? कोरोना व्हॅक्सिन कधी तयार होणार असा सवाल विचारला जात आहे. वैज्ञानिक यासाठी सातत्याने मेहनत घेत आहे. देशामध्ये 3 लशी विविध टप्प्यामध्ये आहेत. कोरोनाची लस लवकरात लवकर भारतीयांपर्यंत पोहोचेल याची सर्व तयारी झाली आहे. प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी रुपरेखा तयार आहे. आज भारतामध्ये एक नाही, दोन नाही तर तीन-तीन व्हॅक्सिन यावेळी टेस्टिंगच्या टप्प्यामध्ये आहेत.’ यावेळी पंतप्रधानांनी असे आश्वासन दिले की जसे वैज्ञानिकांकडून लशीकरता हिरवा कंदिल मिळेल त्यावेळी मोठ्या स्तरावर या व्हॅक्सिनचे उत्पादन करण्याची देशाची तयारी आहे. हे वाचा- Independence Day 2020: 17,000 फूटांवर फडकला भारताचा तिरंगा, पाहा हे PHOTOS भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे - जनधन योजनेत महिलांची 22 कोटी खाती - महिलाशक्तीच्या देशाच्या विकासात वाटा - ग्रामीण उद्योगांना बळकटी देण्याची गरज - एफडीआयनं आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले - पंतप्रधान मोदींकडून ‘व्होकल फॉर लोकल’चा नारा - प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी कार्ड दिलं जाणार