नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या (Pangong Lake) काठावरील जागेसंदर्भात भारत (India) आणि चीन (China) दरम्यान वाटाघाटी झाल्या असून, या भागातून चिनी रणगाडे आठ तासांच्या कालावधीत 100 किलोमीटरहून अधिक अंतर मागे हटले आहेत. पीएलएने एप्रिल 2008 नंतर फिंगर पाईंट 4 ते फिंगर पाईंट 8 दरम्यान बांधलेल्या जेट्टी, हेलिपॅड, तंबू आणि टेहळणी पॉइंट नष्ट करण्यास सुरूवात केली आहे. पेंगाँग सरोवरच्या उत्तरेकडील 134 किलोमीटर अंतरावरील भाग एखाद्या मानवी तळहाताच्या आकारप्रमाणे असून, त्याच्या विस्तारीत भागांना फिंगर्स (Fingers) असे संबोधले जाते. नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर एका लष्करी अधिकाऱ्याने सीएनएन- न्यूज 18ला सांगितले, चीन इतक्या वेगाने सर्व गोष्टी नष्ट करत आहे आणि यंत्रणा मागे घेत आहे हे खरोखरच खूप आश्चर्यकारक आहे.
सीएनएन –न्यूज 18ने मिळवलेल्या विशेष छायाचित्रांमध्ये गेल्या दहा महिन्यांपासून तैनात असलेले चिनी सैन्य पेंगाँग त्सोच्या काठावरुन आता विखुरलेले दिसत आहे. गेल्या 10 महिन्यांपासून आपल्या सैन्यदलाचा भाग असलेले मोठे टॉवर चिनी सैन्याने क्रेनच्या सहाय्याने नष्ट केले असून, हे साहित्य ट्रकमध्ये भरुन नेलं जात असल्याचे या छायाचित्र आणि व्हिडीओतून स्पष्टपणे दिसते. एप्रिल 2020 नंतर सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे लडाखमध्ये (Ladakh) चीन सैन्य भारताविरुद्ध उभं ठाकलं होते. त्यानंतर या भागात त्यांनी बांधकामही केले होते. पेंगाँग त्सो (Pangong Tso) च्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील भागात गेल्या आठवड्यापासून ही बांधकामे पाडणे सुरु झाले आहे.
या दीर्घकाळ तणावाच्या दुष्परिणामांविषयी बोलताना राजकीय विश्लेषक पथिकृत पायणे म्हणाले, की हा भाग रिकामा होताना दिसत असला तरीही चीन हा विश्वासार्ह देश नाही. 10 फेब्रुवारीला दोन्ही देशांनी केलेल्या करारातंर्गत चीन आपले सैन्य फिंगर 8 वरुन हलवण्यास सुरुवात करेल आणि भारत पुन्हा फिंगर 3च्या दिशेने जाईल आणि धनसिंग थापा प्रशासकीय कॅंम्पमध्ये भारत आपले सैन्य कायम ठेवेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारी सूत्रांनी यापूर्वीच सीएनएन-न्यूज 18 ला सांगितले आहे, की डिसएगेंजमेंटचा पहिला टप्पा 15 ते 20 दिवसांत पूर्ण होईल. दक्षिण काठावरील ज्या मोक्याच्या ठिकाणी भारतीय सैन्य आहे ती ठिकाणं शेवटच्या टप्प्यात रिक्त केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत उत्तर भागातील डिसएगेंजमेंट (Disengagement) प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून आहे. या भागात मानवरहित हवाई वाहने आणि उपग्रहांव्दारे पडताळणीची प्रक्रिया सुरु आहे. हे देखील वाचा - पहिल्यांदाच घडलं असेल असं! उड्डाणपुलांची कामं वेळेच्या आत आणि ठरलेल्या बजेटच्याही आत झाली पूर्ण हा एक करार असून, प्रत्येक टप्प्यावर दोन्ही देश समन्वयातून माघार घेण्याच्या प्रक्रियेचं व्हेरिफिकेशन करतील. पेंगाँग त्सोच्या इतर भागात जी प्रगती दिसून येत आहे, त्यावर आम्ही समाधानी झालो तरच कैलास रेंजमधून डिसएगेंजमेंटबद्दल चर्चा केली जाईल, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सीएनएन-न्यूज 18 ला सांगितले.
दक्षिणेकडील भागातून रणगाडे आणि चिलखती वाहने गेल्या आठवड्यातच मागे फिरली आहेत. या भागात दोन्ही बाजूला 100 हून अधिक रणगाडे तैनात होते. पेंगाँग त्सो भागातील डिसएगेंजमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या 48 तासांनंतर 10 कॉर्प्स कमांडर्सची बैठक आयोजित केली जाईल. यावेळी डेप्सांग आणि गोग्रा हॉटस्प्रिंग, डेमचोक या फ्रिक्शन पाईंटसवर चर्चा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान असलेल्या दीड किलोमीटरच्या बफर झोनमुळे शांतता राखण्यास मदत झाली. तत्पूर्वी 15 जून 2020 ला झालेल्या वादादरम्यान 20 भारतीय जवान हुतात्मा झाले तर 48 चिनी सैनिक मारले गेले होते. भारताने ही लढाई जिंकलेली आहे यात कोणतीही शंका नाही. पण ही लढाई अशीच सुरू राहील अशी प्रतिक्रिया लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद भाटिया यांनी दिली.