नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : पूर्व लडाखमधील कडाक्याच्या थंडीमध्ये चीन कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे. चीनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान चुमार-डोमेचोक भागात एलएसीजवळ T-90 आणि T-72 टँकांसह इन्फेंट्री कॉम्बेट व्हीकल्स तैनात करण्यात आलं आहे. याची खासियत म्हणजे हे नियंत्रण रेषेजवळ मायनस 40 डिग्री सेल्सियस तापमानापर्यंत काम करू शकतं. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार 14 कॉर्प्सचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल अरविंद कपूर यांनी सांगितले की, ‘फायर एन्ड फ्यूरी कॉर्प्स’ भारतीय सैन्याचं एकमात्र गठन आहे ज्यात अशा कठीण परिस्थितीत यांत्रिक दलांना तैनात केलं आहे. टँक, इतर सैन्याशी लढणाऱ्या वाहनं आणि जड बंदुका ठेवणं हे या भागातील वातावरण पाहता आव्हानात्मक आहे. क्रू आणि इक्विपमेंटची तयारी पाहण्यासाठी आमची सर्व लॉजिस्टिक तयारी पुरेशी आहे.
हे ही वाचा- भारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा ते पुढे म्हणाले की, लडाखमध्ये कडाक्याची थंडी पडते. या दरम्यान आमची सर्व तयारी झालेली आहे. आमच्याजवळ जास्त कॅलरिज आणि पोषण रेशन आहे. तर इंधन, तेल, कपडे, हिटिंग मशीन्सदेखील पुरेशा आहेत. सध्या सैन्य या वाहनांसाठी 3 प्रकारच्या इंधनांचा वापर करीत आहेत. कडाक्याच्या थंडीत इंधन जमा होई नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारत-चीनदरम्यान एप्रिल-मेपासून तणाव वाढला आहे. मात्र 15 जूनच्या रात्री एलएसीवर गलवान खोऱ्यात दोन्ही देशांमधील सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षामुळे हा तणाव अधिक वाढला आहे. भारतीय व चिनी सैनिकांमध्ये तब्बल 6 तास सुरू असलेल्या या संघर्शात 20 जवान शहीद झाले. तर चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेले. यानंतर अनेकदा चीन व भारतामध्ये चर्चा झाली. मात्र अद्यापही यामधील परिस्थितीत सुधार झाल्याचे दिसून येत नाही.