नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या हवाई हद्दीत दिसणारा चीनचा ‘स्पाय बलून’ खाली पाडण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा आदेश मिळताच अमेरिकेच्या हवाई दलाने उच्च तंत्रज्ञानाच्या F-22 रॅप्टर विमानाच्या मदतीने चिनी बलून खाली पाडले. फुगा खाली आणण्यासाठी सिंगल साइडवाइंडर क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान चिनने सोडलेला गुप्तचर फुग्याच्या नाश करण्यात आल्यामुळे कोणतीही जिवीत हाणी अथवा इजा झाली नाही.
अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनाच्या किनारपट्टीपासून सुमारे 9.6 किलोमीटर (6 मैल) अंतरावर अटलांटिक महासागरात तो बलून खाली पाडण्यात आला. अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील लँगली हवाई दलाच्या तळावरून फायटर एअरक्राफ्टने स्पाय बलून खाली पाडण्यासाठी उड्डाण केले होते.
हे ही वाचा : विज्ञानही झाले चकित दर्ग्यातील हा चमत्कार पाहून! मुंबईत कोठे आहे हे ठिकाण
चिनी बलूनचा अमेरिकन एअर स्पेसमध्ये प्रवेश हे अमेरिकन संप्रभुतेच उल्लंघन असल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या फायटर जेट्सनी दक्षिण कॅरोलिना येथील समुद्र किनाऱ्याजवळ हा बलून पाडला. बलून विरोधात शक्तीचा उपयोग ही अतिप्रतिक्रिया असून आंतरराष्ट्रीय प्रथांच उल्लंघन असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
चीन या बलूनच्या माध्यमातून हेरगिरी करत होता, असं पेंटागन आणि अन्य अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं. तीन स्कूल बस इतका या बलूनचा मोठा आकार होता. जवळपास 60 हजार फूट उंचीवर अमेरिकेत पूर्वे दिशेला हा बलून सरकत होता. देखरेख आणि गुप्त माहिती गोळा करण्यासाठी या बलूनचा उपयोग केला जातो, असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हे ही वाचा : पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन
अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांची माहिती गोळा करण्यासाठी या बलूनचा उपयोग करण्यात आला, असा अमेरिकेचा दावा आहे. यामुळे दोन्ही देशातील कुटनितीक स्तरावरील संबंध बिघडणार आहेत. या घडामोडींनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री एंटोनी ब्लिंकन यांनी आपला चीन दौरा रद्द केला आहे.