JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / कॉस्मेटिक सर्जरी करण्याचे तोटे आणि फायदे काय? पाहा तज्ञ काय म्हणतात

कॉस्मेटिक सर्जरी करण्याचे तोटे आणि फायदे काय? पाहा तज्ञ काय म्हणतात

अधिक सुंदर दिसण्यासाठी बॉलिवूड किंवा हॉलिवूड अभिनेत्रींनी प्लास्टिक किंवा कॉस्मेटिक सर्जरी केल्याचं तुम्ही अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असेल.

जाहिरात

कॉस्मेटिक सर्जरी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : अधिक सुंदर दिसण्यासाठी बॉलिवूड किंवा हॉलिवूड अभिनेत्रींनी प्लास्टिक किंवा कॉस्मेटिक सर्जरी केल्याचं तुम्ही अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असेल. अशा सर्जरीज फार महागड्या असतात, त्यामुळे त्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच्या मानल्या जातात; मात्र आता अशा सर्जरी करून घेणाऱ्यांमध्ये सामान्य व्यक्तींचीही संख्या वाढताना दिसत आहे. एका अहवालानुसार, मुंबईतली सरकारी रुग्णालयं अत्यंत स्वस्त दरात फेसलिफ्टसारख्या कॉस्मेटिक सर्जरी करत आहेत. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी रुग्णालयं अत्यंत कमी खर्च आकारत आहेत. त्यामुळे अशा सर्जरी करून घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कधी-कधी या सर्जरी अयशस्वी होण्याचा धोकाही असतो. असं झाल्यास व्यक्तीचं रूप चांगलं होण्याऐवजी आणखी बिघडू शकतं. म्हणून, कोणत्याही प्रकारची कॉस्मेटिक सर्जरी करून घेण्यापूर्वी त्याचे फायदे-तोटे माहिती असणं आवश्यक आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये सरकारी रुग्णालयांचा सहभाग वाढत असल्याने प्लास्टिक सर्जरी करून घेणाऱ्या निम्न-मध्यमवर्गीयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, खासगी रुग्णालयात फेसलिफ्ट सर्जरीसाठी एक लाख रुपये आकारतात; मात्र मुंबईतल्या जेजेसारख्या सरकारी रुग्णालयात ही सर्जरी फक्त 950 रुपयांमध्ये होते. जेजे रुग्णालयाने 2016 ते 2021 या कालावधीत 127 लायपोसक्शन, 23 केस प्रत्यारोपण आणि 139 ऱ्हायनोप्लास्टी केल्या आहेत. अशीच आकडेवारी बीएमसी संचालित केईएम आणि नायर रुग्णालयांची आहे. तिथेही 2016 ते 2021 दरम्यान कॉस्मेटिक सर्जरीजमध्ये वाढ झाली आहे. हेही वाचा -  बहुगुणी आहे कोरफड! स्कीनपासून ते हृदय-किडनीच्या समस्यांवर असा होतो फायदा सरकारी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या सर्जरीजचं प्रमाण निश्चितपणे वाढलं आहे; पण सर्जनकडे येणारी बहुतांश प्रकरणं ही अपघातानंतर केलेल्या कॉस्मेटिक सर्जरीPची आहेत, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 2019 ते 2021दरम्यान, मुंबईतल्या केईएम रुग्णालयात 1900हून अधिक, जेजेमध्ये 1500 आणि नायर येथे 1800 विविध प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरीज करण्यात आल्या आहेत. कॉस्मेटिक सर्जरीची गुंतागुंत ओल्ड एअरपोर्ट रोडवरच्या मणिपाल हॉस्पिटलमधले प्लास्टिक सर्जरी सल्लागार डॉ. श्रीकांत व्ही यांनी ‘न्यूज 9’ला सांगितलं, की गुंतागुतीशिवाय कोणतीही सर्जरी होत नाही. सर्जरीचं यश किंवा अपयश हे सर्जनच्या कौशल्यावर अवलंबून असतं. त्यांना संबंधित धोके कमी करावे लागतात. इतर कोणत्याही सर्जरीप्रमाणे कॉस्मेटिक सर्जरीमध्येदेखील गुंतागुंत होऊ शकते. फेसलिफ्ट सर्जरीनंतर पेशंटला थोडं अस्वस्थ वाटू शकतं. कॉस्मेटिक सर्जरीजमध्ये गंभीर दुष्परिणाम होत नाहीत, असं अनेक संशोधनांमध्ये दिसून आलं आहे; मात्र प्लास्टिक सर्जरीमुळे काही परिणाम होऊ शकतात. याबाबत डॉ. श्रीकांत सांगतात, की लिपोसक्शन सर्जरीमध्ये मांड्या आणि ओटीपोटातली चरबी काढून टाकतात. त्यानंतर, वजन वाढलं तर पेशींची असमान वाढ होण्याचा धोका असतो. इतर गुंतागुंतींमध्ये हिमॅटोमाचा (Haematoma) समावेश होतो. ही एक मोठी वेदनादायक जखम असते. ती रक्ताच्या पॉकेटप्रमाणे दिसते. ब्रेस्ट सर्जरीच्या एक ते सहा टक्के प्रकरणांमध्ये ही समस्या उद्भवते. याबाबत डॉ. श्रीकांत म्हणाले, “सर्जरीवेळी रक्तस्राव होणं सामान्य आहे. यामुळे घातक परिणामांसह ब्लड प्रेशरही कमी होऊ शकतं. सर्जरीनंतर अंतर्गत रक्तस्रावदेखील होऊ शकतो.”

सर्व शस्त्रक्रियांमध्ये संसर्ग ही सर्वसामान्य गुंतागुंत आहे. सुमारे दोन ते चार टक्के जणांना याचा सामना करावा लागू शकतो. स्तनाच्या शस्त्रक्रियेनंतर सेल्युलायटिसची गुंतागुंत होऊ शकते. इतर काही गंभीर गुंतागुंतीदेखील उद्भवतात. प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर रुग्णाच्या शरीराला मुंग्या येणं आणि बधिरपणा जाणवू शकतो. त्वचा विशेषज्ञ डॉ. किरण लोहिया यांच्या मते, ‘कोणताही सर्जन 100 टक्के जोखीम टाळू शकत नाही; पण सर्जरीपूर्वी रुग्णाला या धोक्यांची माहिती देणं, सर्वांत महत्त्वाचं काम आहे. अनुभवी कॉस्मेटिक सर्जन शोधणं आणि त्यांनी पूर्वी केलेल्या सर्जरीजची नोंद तपासणं, हे रुग्णाचं कर्तव्य आहे. तसंच, रुग्णाला सर्जरीपूर्वीची आणि नंतरची प्रक्रिया माहित असणं आवश्यक आहे.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या