नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : आपलं मूल सुदृढ असावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. गुबगुबीत दिसणाऱ्या मुलांकडे कौतुकाने पाहिलं जातं. ‘खात्या-पित्या घर’चा अशी उपमाही या मुलांना देण्यात येते. पण आता मात्र ही संकल्पना बदलून गुबगुबीत वर्गात मोडणारी मुलं स्थूल तर नाहीत ना, हे तपासण्याची गरज आहे. कारण बालपणात वजन वाढणं (Weight Gain) ही एक गंभीर समस्या आहे, जी पुढे जाऊन लठ्ठपणामध्ये रूपांतरित होऊ शकते. गुबगुबीत आहे, असे म्हणून आपण आपल्या लहानग्यांच्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करतो. पण बालपणात लठ्ठ असणं केवळ आरोग्याच्या दृष्टीने धोका वाढवत नाही, तर मोठे झाल्यानंतर या लठ्ठपणावर नियंत्रण (Control Weight Gain) मिळवणं सहजासहजी शक्य होत नाही. झी न्यूज ने याबाबत वृत्त दिलं आहे. मुलांच्या वाढत्या वजनामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव, विकासात अडथळा, शारीरिक वेदना इत्यादी समस्या देखील येऊ लागतात. मुलांचं वजन वाढण्याची विविध कारणं (Weight Gain in Children) आहेत. मायो क्लिनिकच्या तज्ज्ञांच्या मते, मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या (childhood obesity) ही खालील कारणांमुळे निर्माण होऊ शकते. राष्ट्रीय पोषण सप्ताह: कोणत्या वयात कसा असावा आहार? वेगवेगळा असतो परफेक्ट Diet Plan 1. स्नॅक्स, चाट, फास्ट फूड, स्ट्रीट फूड आणि उच्च कॅलरीयुक्त आहार (Weight gain causing diet) हे मुलांमध्ये लठ्ठपणाचे (obesity in kids) मुख्य कारण आहे. याशिवाय टॉफी, मिठाई आणि शीतपेयांमुळेही मुलांचं वजन वाढू लागतं. त्यामुळे मुलांच्या आहाराकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. 2. ज्या मुलांना खेळांमध्ये कमी रस असतो किंवा जी मुलं व्यायाम करत नाहीत, ते पुरेशा प्रमाणात आपल्या कॅलरीज बर्न करू शकत नाहीत. म्हणजेच व्यायाम खेळ हे त्यांच्या आयुष्यात नसल्याने त्यांना घाम येत नाही आणि शरीरात साठलेल्या कॅलरीज वापरल्याही जात नाहीत. दिवसभर अंथरुणावर, सोफ्यावर पडून राहत मोबाईलचा वापर करणं, टीव्ही पाहणं, खाणं-पिणं मुलांमध्ये लठ्ठपणाचे कारण ठरू शकतं. 3. जर मुलांचे पालक किंवा कुटुंबातील लोकांना लठ्ठपणाची समस्या असेल तर मुलांचं वजन वाढण्याचा धोका देखील जास्त असतो. यामागील पहिलं कारण अनुवंशिक आहे. दुसरं कारण म्हणजे ज्या मुलांच्या घरात लठ्ठपणाची समस्या दिसते, त्यांच्या घरात आहारात उच्च-कॅलरीयुक्त पदार्थांचा (high calorie foods) समावेश असू शकतो. मुलंदेखील त्याला बळी पडू शकतात. उपवास करणं आरोग्यासाठी लाभदायक की हानिकारक? पाहा काय सांगतात तज्ज्ञ 4. काही मुलांचं वजन वाढण्यामागे तणावासारखी मानसिक कारणंही असतात. हा तणाव वैयक्तिक असू शकतो किंवा पालक किंवा कुटुंबामुळे येऊ शकतो. तणावामुळे काही मुलं अति खाणं, किंवा अनियमित जीवनशैलीला बळी पडण्याचा धोका असतो. 5. मुलांचं वजन हे विविध औषधांच्या सेवनामुळे सुद्धा वाढू शकत. यासोबतच शरीरातील हॉर्मोनल बदल देखील वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. जर बराच काळ एखादं औषध घेतल्यामुळे किंवा कोणत्याही कारणाशिवाय मुलाचं वजन वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. लहान मुलांमधला लठ्ठपणा टाळण्यासाठी सर्वप्रथम त्यांना मैदानावर खेळण्यास आणि नियमित व्यायाम करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यायला हवं. पोहणं आणि सायकलिंगसारखे व्यायामही लाभदायक ठरू शकतात. या शिवाय त्यांच्या आहारावर नियंत्रण असलं पाहिजे. तुम्ही जर अशी काळजी घेतलीत तर तुमची मुलं लठ्ठ होणार नाहीत.