JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / झोपळ्यावर बसून घ्या झोक्याचा आनंद, आरोग्यावर होईल बराच Positive परिणाम

झोपळ्यावर बसून घ्या झोक्याचा आनंद, आरोग्यावर होईल बराच Positive परिणाम

झोका खेळल्यामुळे फक्त आनंदच मिळत नाही, तर आरोग्याच्या दृष्टिनेही त्याचे चांगले फायदे (Benefits of Swinging) मिळतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 सप्टेंबर: लहान मुलांना झोका (Swinging) खेळण्याची आवड असते. एवढचं काय, अनेक महिला, पुरुष यांनाही झोक्यावरून बसून झुलणं खूप आवडतं. हा छंद पूर्ण करण्यासाठी श्रावण-भाद्रपद महिन्यात अनेक जण आपल्या घरामध्ये झोका बांधतात. तसंच सार्वजनिक उद्यानात किंवा यात्रेत सुद्धा झोका खेळण्याचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, झोका खेळल्यामुळे फक्त आनंदच मिळत नाही, तर आरोग्याच्या दृष्टिनेही त्याचे चांगले फायदे (Benefits of Swinging) मिळतात. झोका खेळल्यामुळे आरोग्याला कोणते फायदे (Benefits) मिळतात, ते जाणून घेऊयात. मूड चांगला होण्यास मदत झोका खेळल्यामुळे आपला मूड चांगला होऊ शकतो. काही कारणांमुळे जर तुमचा मूड खराब झाला असेल, तर झोका खेळणं हा एक चांगला उपाय असू शकतो. झोका खेळताना शरीरात हॅपी हॉर्मोन्स (Happy Hormones ) तयार होतात, त्यामुळे मूड चांगला होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हीही हा प्रयोग करून बघू शकता. शरीराचा व्यायाम झोका खेळताना शरीराचा व्यायाम (Exercise of the body ) होतो. कारण झोका खेळताना आपण पुढे आणि मागे जात असतो. या प्रक्रियेमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

कमी गर्दीच्या ठिकाणी फिरायला जायचा बेत आहे का? मग या ठिकाणांचा नक्की करा विचार

मानसिक ताण कमी होण्यास मदत झोका खेळल्यामुळे मनावरचा ताण (Stress) कमी होतो, आणि मनामध्ये आनंदाची भावना तयार होते. उदास असताना झोका खेळल्यास आपली उदासीनता कमी होण्यास मदत होते, तसंच आपल्याला आलेल्या ताणाची पातळी कमी होते. स्नायू सक्रिय होतात आपल्या शरीरातील स्नायू सक्रिय ठेवण्यास झोका खेळल्यामुळे खूप फायदा होतो. झोका खेळताना आपलं शरीर हे मागे-पुढे जात असतं. त्यावेळी शरीराचे सर्व भाग आणि स्नायू सक्रिय (Muscle Activation) असतात.

इथं प्रत्येक पुरुषाच्या 2 बायका! दुसऱ्या लग्नाला नकार दिल्यास मिळते भयानक शिक्षा

एकाग्रता वाढतं झोका खेळताना मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. संतुलन कसं राखावं, हेदेखील मुलं शिकतात. झोका खेळल्यामुळे मुलांच्या मानेचे स्नायू मजबूत होतात. आत्मविश्वास वाढण्यास मदत आपल्या शरीरातील सांध्यांमध्ये रिसेप्टर्स असतात. जेव्हा ते सक्रिय होतात, तेव्हा ते शरीराला सिग्नल देण्यास सुरुवात करतात. झोका खेळताना आपण पायांच्या हालचालीने झोका पुढे-मागे करत असतो. त्यावेळी शरीर हे सांध्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत करू लागतं. या प्रक्रियेमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

उच्च रक्तदाबाची (High BP) सर्वसाधारण दिसणारी ही लक्षणं तुम्हाला माहीत आहेत का?

आपलं आरोग्य चांगलं राहावं, यासाठी विविध खेळांचे फायदे होत असतात. उद्यानात फिरण्यासाठी गेल्यानंतर तेथे असलेला झोका पाहून अनेकांना झोका खेळण्याचा मोह आवरत नाही. झोका खेळल्यामुळे केवळ आनंदच मिळत नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदे होत असतात. त्यामुळे झोका खेळण्याचा मोह न आवरता तो खेळण्याचा आनंद घेणे फायदेशीर ठरू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या