JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / तणावमुक्तीसाठी शिल्पा शेट्टीनं सांगितलं हे खास आसन; वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त

तणावमुक्तीसाठी शिल्पा शेट्टीनं सांगितलं हे खास आसन; वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त

शिल्पा शेट्टीने अलीकडेच तिचा एक वर्कआउट व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती उत्थान पृष्ठासन (utthan pristhasana) करताना दिसत आहे. तिनं या योगासनाचे अनेक फायदे देखील सांगितले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 सप्टेंबर : आपल्या फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अलीकडेच तिचा एक वर्कआउट व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती उत्थान पृष्ठासन (utthan pristhasana) करताना दिसत आहे. तिनं या योगासनाचे अनेक फायदे देखील सांगितले आहेत. उत्थान पृष्ठासन काय आहे आणि कोणासाठी फायदेशीर आहे ते जाणून घेऊया. व्हिडिओच्या पोस्टमध्ये शिल्पाने म्हटलं आहे की, ‘सकाळी शरीराला चांगला ताण देणे ही सर्वांसाठी चांगल्या दिवसाची सुरुवात आहे. यामुळं शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया चांगली राहते. स्नायू बळकट राहतात आणि तणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळं मी माझ्या दिवसाची सुरुवात आकाशाखाली जमिनीवर पशु-पक्ष्यांचा किलबिलाट उत्थान पृष्ठासन करून करते. या आसनाला लिझर्ड पोझ (सरडा किंवा पालीसारखे आसन करणे) असेही म्हणतात. उत्थान पृष्ठासन केवळ शरीराची लवचिकता सुधारत नाही तर हॅमस्ट्रिंग, हिप फ्लेक्सर्स आणि कंबर हलकी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त त्यामुळं आतील मांड्या आणि चतुर्भुजांना बळकटी मिळते. ज्यामुळे नितंबांचाही व्यायाम होतो, शरीराचे वरचे भाग म्हणजे मेंदूपर्यंत आराम मिळतो आणि नसांचे कार्यही अधिक चांगले बनते. या आसनामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि पोटाची चरबीही आत जाते. हे वाचा -  आता मर्यादाच ओलांडली! कारमध्ये सामूहिक बलात्कार करून तरुणीला हायवेवर फेकलं हे आसन कोणी करू नये शिल्पाने तिच्या पोस्टमध्ये हे आसन कोणी करू नये याबाबतही माहिती दिली आहे. ज्यांच्या नितंबांना काही त्रास आहे किंवा तेथे कोणती शस्त्रक्रिया झाली असेल किंवा एखाद्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असेल किंवा एखाद्याचे खांदे कमकुवत असतील किंवा दुखावले असतील तर ही मुद्रा करणे टाळावे. कसं करावे हे आसन पहा -

संबंधित बातम्या

शिल्पा शेट्टीने या आसनाच्या स्टेप कशा कराव्यात याची व्हिडिओतून माहिती दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या