JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / दोन्ही हातांच्या रक्तदाबात खूप फरक असेल तर तुमच्या जीवाला धोका; वाचा कारण आणि BP तपासण्याची योग्य पद्धत

दोन्ही हातांच्या रक्तदाबात खूप फरक असेल तर तुमच्या जीवाला धोका; वाचा कारण आणि BP तपासण्याची योग्य पद्धत

रक्तदाब तपासण्यापूर्वी अर्धा तास धूम्रपान किंवा अल्कोहोल घेऊ नये. रक्तदाब तपासताना आरामात बसावे, पाय सरळ ठेवावेत.

जाहिरात

रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेतल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामध्ये भरपूर लिंबूवर्गीय अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन-सी असतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जुलै: आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब (Blood Pressure) योग्य असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. यात होणारा बदल आरोग्यावर विपरीत परिणाम करतो. त्यामुळं रक्तदाब योग्य राहण्यासाठी अनेकांना औषधंही घ्यावी लागतात. रक्तदाब अचानक वाढणं किंवा कमी होणं धोकादायक असू शकतं. त्यामुळं रक्तदाबाचा विकार असणाऱ्या लोकांनी काळजी घेण्याची गरज असते. यासाठी आजकाल घरीदेखील रक्तदाब तपासण्याचे यंत्र वापरले जाते. मात्र रक्तदाब तपासताना एकाच हातावर तो मोजला जातो. रक्तदाब तपासण्याचा हा योग्य मार्ग नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दोन्ही हातावर रक्तदाब मोजणे (Measure Blood Pressure on both Hands) आवश्यक आहे. कारण दोन्ही हातावरील रक्तदाबात खूप तफावत (Difference in both Blood Pressures) असेल तर हा धोक्याचा इशारा ठरू शकतो, असं अलीकडेच झालेल्या एका संशोधनात सिद्ध झालं आहे. भास्कर डॉट कॉम नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. ब्रिटनमधील (Britain) संशोधकांनी 230 लोकांवर संशोधन केल्यावर, दोन्ही हातांच्या रक्तदाबात खूप फरक असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा इतर कारणांमुळे अकाली मृत्यू येण्याचा धोका असल्याचा दावा केला आहे. दोन्ही रक्तदाबात थोडा फरक असणं सामान्य आहे; पण जास्त फरक असणं धोकादायक आहे, असं या संशोधनाचे प्रमुख एक्सटर युनिव्हर्सिटीच्या पेनिन्सुला कॉलेज ऑफ मेडिसिन अँड डेन्टीस्ट्रीमधील डॉ. क्लार्क यांनी म्हटलं आहे. त्यामुळं डॉक्टरांनी रुग्णाच्या रक्तदाबाची तपासणी करताना दोन्ही हातांवर करावी, असा सल्ला डॉ. क्लार्क यांनी दिला आहे. तुम्ही चहा बनवताना या चुका करताय का? ही आहे Perfect Tea बनवण्याची योग्य पद्धत यापूर्वी दी लान्सेट (The Lancent) या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनातही दोन्ही हातांच्या रक्तदाबात बराच फरक असेल तर त्यामुळे रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार होऊ शकतात. यामुळे मृत्यूचा धोका वाढतो, असं नमूद करण्यात आलं होतं. या संशोधनामुळे रक्तदाब तपासताना दोन्ही हातांचा रक्तदाब तपासणे आवश्यक असल्याचं सिद्ध झालं आहे. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाबात 10 मिलीमीटरचा (मिमी एचजी) फरक सामान्य आहे, परंतु त्यापेक्षा जास्त फरक हृदयाच्या विकाराचे संकेत देतो, असं ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या वरिष्ठ नर्स मौरिन टॅलबोट यांनी म्हटलं आहे. 3400 रूग्णांची रक्तदाब तपासणी दोन्ही हातांच्या रक्तदाबातील फरक समजून घेण्यासाठी अमेरिकेतील मॅसेच्युसेट हॉस्पिटलमध्ये 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 3400 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या रुग्णांना हृदयरोगाची (Heart Problems) पूर्वीची कोणतीही लक्षणं नव्हती. या लोकांचा दोन्ही हातांचा रक्तदाब तपासण्यात आला. या तपासणीत 10 टक्के लोकांमध्ये दोन्ही हातांच्या सिस्टोलिक रक्तदाबात 10मिलिमीटरपेक्षा जास्त अंतर आढळले. या लोकांवर 13 वर्षे देखरेख ठेवण्यात आली. तेव्हा 10पेक्षा जास्त मिलिमीटरचा फरक असलेल्या लोकांपैकी 38 टक्के लोकांना हृदयविकाराचा झटका, तसंच हृदयविकार झाल्याचे आढळले. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये, दोन्ही हातांच्या रक्तदाबात 10 किंवा त्यापेक्षा जास्त फरक असेल तर त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हे यावरून स्पष्ट झालं आहे. साखर तपासण्यासाठी आता नाही टोचावी लागणार सुई; रक्त तपासणीशिवायच कळेल Sugar level रक्तदाब तपासताना ही घ्या काळजी  रक्तदाब तपासण्यापूर्वी अर्धा तास धूम्रपान किंवा अल्कोहोल घेऊ नये. रक्तदाब तपासताना आरामात बसावे, पाय सरळ ठेवावेत. रक्तदाब तपासताना हात कोपराच्या सहायाने हृदयाच्या समपातळीत येतील असा ठेवावा. हाताच्या वरच्या भागात पट्टी बांधून मशीनवर दिलेल्या सूचनानुसार रक्तदाब तपासावा. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी रक्तदाब नियंत्रित ठेवायचा असेल तर दररोज अर्धा तास व्यायाम करावा. प्राणयाम, ध्यानधारणा करावी. आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करावा. ताण घेऊ नये. वजन वाढलेलं असेल तर ते कमी करावे, एक दिवसात दोनपेक्षा जास्त प्रमाणत दारू घेऊ नये. धूम्रपान, तंबाखूचं व्यसन असेल तर ते सोडावं. स्युडोएफेड्रीनयुक्त औषधं घेणं टाळावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या