JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / ब्लड शुगर वाढण्यामागचं 'हे' कारण वाचून व्हाल हैराण; मानसिकतेशी आहे संबंध

ब्लड शुगर वाढण्यामागचं 'हे' कारण वाचून व्हाल हैराण; मानसिकतेशी आहे संबंध

डायबेटीसच्या रुग्णाला ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागतं.

जाहिरात

रक्तातील साखर वाढण्याचं कारण

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 15 डिसेंबर : डायबेटीस अर्थात मधुमेह हा शरीरात गुंतागुंत निर्माण करणारा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. बदलेली जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, ताणतणाव, बैठं काम, व्यायामाचा अभाव आणि अनुवंशिकता यामुळे डायबेटीसचा धोका वाढतो. डायबेटीसमुळे दृष्टी, हृदय आणि किडनीशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. डायबेटीसच्या रुग्णाला ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. रुग्णाला सतत भूक लागू नये यासाठी तज्ज्ञ आहारात प्रोटीन, फायबर्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. कारण केवळ कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ सेवन केल्यास ब्लड शुगर वाढू शकते; मात्र डायबेटीसच्या रुग्णाला सतत भूक लागण्यामागे आणखी एक कारण असतं. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. हँग्री असं या कारणाचं नाव आहे. हंगर आणि अँग्री या दोन इंग्रजी शब्दांपासून हा शब्द तयार झाला असून, ही एक शारीरिक आणि मानसिक अवस्था असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या अवस्थेविषयी सविस्तर जाणून घेऊ या. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. हेही वाचा - पाणी तर बसूनच पण दूध कसं प्यावं? दुधाबाबतचं हे फॅक्ट तुम्हाला माहिती हवंच सध्या हँग्री हा नवीन शब्द विशेष चर्चेत आहे. हा शब्द हंगर आणि अँग्री या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. या शब्दाचा थेट संबंध डायबेटीस रुग्णांशी आहे. जेव्हा भूक आणि राग दोन्ही एकाच वेळी असतात, तेव्हा या स्थितीला हँग्री असं म्हणतात. काही वेळा भूक लागल्यावर तुम्ही चिडचिड करू लागता, तेव्हा ती हँग्री अवस्था असते आणि ही अवस्था निश्चितच असामान्य नसते. हँग्रीपासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञ जेवणात प्रोटीन्स, फायबर्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ घेण्याचा सल्ला देतात. केवळ कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते आणि डायबेटीसचा धोका संभवतो. तसंच यासाठी तज्ज्ञ दिवसभरात काही ठरावीक वेळाने थोडं-थोडं खाण्याचा सल्ला देतात आणि फायबर्स, प्रोटीनसाठी ड्रायफ्रूट्स, फळांचा आहारात समावेश करण्यास सांगतात.

भूक लागल्यानंतर लहानसहान गोष्टींवरून राग येणं म्हणजे हँग्री ही स्थिती होय. यामागे शारीरिक आणि मानसिक कारणं आहेत. तज्ज्ञांच्या मते भुकेचा संबंध नकारात्मकतेशी असतो. यामुळे आपल्या रोजच्या कामांवर आणि निर्णयक्षमतेवर परिणाम होतो. हँग्री या समस्येमागे काही कारणं आहेत. हँग्री स्थितीमागचं पहिले कारण म्हणजे न्यूरॉन होय. हे न्यूरॉन भूक आणि भावना कंट्रोल करणाऱ्या मेंदूतल्या हायपोथॅलॅमसवर परिणाम करतात. हँग्रीमध्ये एजीआरपी न्यूरॉन्स पेशी सक्रिय होतात आणि नकारात्मक जाणवू लागते. हँग्रीसाठी दुसरं कारण हॉर्मोनशी संबंधित आहे. शरीरातली ग्लुकोजची पातळी कमी झाल्यावर आपल्याला भूक लागते. यादरम्यान शरीरात अ‍ॅड्रिनालिन आणि कॉर्टिसोल ही हॉर्मोन्स रिलीज होतात. या दोन्ही हॉर्मोन्समुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते आणि यामुळे चिडचिड होते किंवा राग येतो, असं तज्ज्ञांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या