फळ, भाज्या वेगवेगळे प्रकारचे पदार्थ आहेत. त्यामुळे पचायला लागणारा कालावधी वेगवेगळा असतो. त्यामुळे एकत्र खाऊ नयेत असं डॉक्टरही सांगतात.
मुंबई 11 जुलै: रोजच्या धावपळीत प्रत्येक वेळी ताजं जेवण (Fresh Food) बनवायला वेळ मिळेल असं नाही. कधीकधी आपण उरलेलं जेवण फ्रीजमध्ये (Fridge) ठेवून देतो. फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ नक्कीच टिकतात मात्र, त्या पदार्थांमध्ये पोषक घटक**(Nutrients)असतात का? रात्री उरलेलं जेवण किंवा एखादा पदार्थ(Leftover Food)**आपण सहजपणे डब्यामध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवून देतो. कारण तो पदार्थ फेकायला आपल्याला आवडत नाही. मात्र हा पदार्थ फ्रिजमध्ये ठेवून टिकवल्यामुळे तो खाण्यायोग्य राहतो का? त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेले एखादा पदार्थ किती वेळ खाण्यायोग्य राहू शकतो किंवा फ्रिजमध्ये फळं, भाज्या ठेवावेत की नाही? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडू शकतो. फ्रिजमध्ये शिजलेले अन्नपदार्थ ठेवताना ते उघडे ठेवल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया (Bacteria) वाढू शकतो त्यामुळे पदार्थ फ्रिजमध्ये स्टोअर करताना स्टिलच्या डब्ब्यात बंद करून ठेवावेत. तर पाहूयात फ्रिजमध्ये कोणते पदार्थ किती वेळ टिकतात. भात - फ्रिजमध्ये भात 2 दिवसच ठेवावा. फ्रिजमधून भात काढल्यानंतर तो नॉर्मल तापमानावरती आल्यानंतर किंवा गरम करूनच खावा. चपाती - चपाती फ्रिजमध्ये ठेवली तर, ती जास्तीत जास्त 12 ते 14 तासच टिकू शकते. यानंतर तिच्यातले पौष्टिक घटक खराब व्हायला लागतात. पौष्टिक घटकांचा नाश होतो त्यामुळे पोटदुखी सुद्धा होऊ शकते. ( अंथरूणातच करा काही व्यायाम;दिवासाची सुरूवात होईल उत्साही ) शिजलेली डाळ - शिजलेली डाळ फ्रिजमध्ये ठेवत असाल तर ती जास्तीत जास्त 2 दिवस टिकू शकते. यापेक्षा जास्त दिवस फ्रिजमध्ये डाळ राहिली तर अशी डाळ खाल्ल्यामुळे पोटात गॅस वाढू शकतो. **कापलेली फळं -** कापलेली फळं उरली असतील तर, आपण त्यांना फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण, प्रत्येक फळ ठराविक काळ टिकू शकतं. त्यानंतर त्यातील पोषक घटक संपू लागतात. त्यामुळे अगदी रात्रभर फ्रिजमध्ये राहिलेलं फळ खाऊ नये. ( मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही?; या वास्तू Tips करतील कमाल ) पपई - कापलेली पपई फ्रिजमध्ये जास्तीत जास्त 8 तास राहू शकते. त्यानंतर त्यात विषारी पदार्थ वाढायला लागतात. 12 तासानंतर फ्रिजमध्ये ठेवलेली पपई खाल्ली तर त्याले घटक आरोग्याला हानिकारक ठरतात. कापलेल****ं सफरचंद - सफरचंद कापल्यानंतर काळं पडायला लागतं. यामध्ये ऑक्सिडेशन होत असतं त्यामुळेच वरचा भाग काळा होतो. कापलेलं सफरचंद फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर 4 तास चांगलं राहू शकतं. ( छोटीशी बी इतकी फायदेशीर; टाकून देऊ नका, भाजीपेक्षा मिळतील जास्त न्यूट्रिशन्स ) आणखीन काही पदार्थ फ्रिजमध्ये किती दिवस टिकतात तेही पाहूयात. सफरचंद 4 ते 6 दिवस, चेरी 7 दिवस. ब्लूबेरी,रासबेरी,स्ट्रॉबेरी,ब्लॅकबेरी 3 ते 6 आठवडे, आंबट फळं 1 ते 3 आठवडे, द्राक्ष 7 दिवस, कलिंगड टरबूज न कापता 2 आठवडे, कापल्यानंतर 2 ते 4 दिवस, अननस 5 ते 7 दिवस, 1 ते 2 दिवस, काकडी 4 ते 6 दिवस.