ग्रीक योगर्ट प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहे.
मुंबई, 06 जानेवारी : जगभरात आवडीने खाल्लं जाणारं ग्रीक योगर्टला पॉवर स्नॅक्स कॅटेगरीमध्ये येतं. पोषक तत्व भरपूर प्रमाणात असणारं हे दही चवीलाही सुंदर असतं. त्यामुळेच लोक आवडीने खातात. यामध्ये प्रोटीन प्रचंड प्रमाणात असल्यामुळे केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. केस आणि त्वचेच्या अनेक समस्या यामुळे कमी होऊ शकतात. जाणून घेऊयात ग्रीक योगर्ट वापरण्याची पद्धत. नॅचरल कंडिश्नर ग्रीक योगर्ट केसांसाठी नॅचरल कंडीशनर प्रमाणे काम करतं. त्यामुळे केसांचा रूक्षपणा जाऊन केस सुंदर आणि मुलायम बनतात. याचा वापर करणही सोपं आहे. ग्रीक योगर्ट चांगलं फेटून संपूर्ण केसांना लावावं आणि अर्धा तास केसांवर ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन टाका. दर पंधरा दिवसांनी या हेअर पॅकचा वापर करावा. यामुळे केसांचे प्रॉब्लेम कमी होऊन केस मुलायम बनतात. यामध्ये मधाचा ही वापर करता येतो. केसांना फाटे फुटले असतील तर केसांना स्प्लिट अँड झाले असतील तर ग्रीक योगर्ट केसांना लावावा. यामुळे केसांचे फाटे जातील. केस दुरूस्त होऊन मजबूत बनतील. आठवड्यातून दोनदा तुम्ही केसांवर हे लावू शकता. केसातील कोंडा कमी होतो केसात कोंडा असेल तर खूप जास्त त्रास व्हायला लागतो. त्यासाठी ग्रीक योगर्ट वापरू शकता. एका भांड्यामध्ये 4 चमचे ग्रीक योगर्ट घ्या, त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका व्यवस्थित एकत्र करून केसांच्या त्वचेला लावा आणि अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुऊन टाका. आठवड्यातून एकदा या याचा वापर केल्याने कोंडा कमी झाल्याचे तुम्हाला दिसेल.
केसांच्या मजबूतीसाठी केस कमजोर झाल्यानंतर गळायला लागतात आणि त्यामुळे टक्कल पडायला लागतं. यासाठी ग्रीक योगर्ट वापरू शकता. ग्रीक योगर्टमध्ये कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट टाका आणि केसांवर व्यवस्थित लावा हा पॅक वापरल्यामुळे केस गळती कमी होईल. केसांची वाढ केसांची वाढ होण्यासाठी या ग्रीक योगर्टचा वापर करा. यासाठी त्यामध्ये थोडसं खोबरेल तेल आणि जास्वंदाची पानं टाका चांगलं फेटून केसांना लावा. काहीच दिवसांमध्ये फरक दिसेल. हे वाचा - आवडत नसलं तरी खायला हवं बीट; थायरॉईडसारख्या आजारांवर असा होतो परिणाम त्वचेला फायदा चेहरा ड्राय झाला असेल तर अर्धा कप या दह्यामध्ये एक चमचा ऑलीव्ह टाका आणि 1 चमचा लिंबाचा रस एकत्र करून. चेहर्यावर लावा थोड्यावेळाने धुऊन टाका. यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा निघून जाईल. उन्हामुळे त्वचा काळवंटली असेल तर त्या जागेवर ग्रिट योगर्ट लावा. थोड्यावेळाने धुऊन टाका यामुळे त्वचेला थंडावा मिळेल. या दह्याने चेहऱ्यावर मसाज केल्यास ब्लीच प्रमाणे काम करतं. रोज चेहऱ्यावर दही लावल्यामुळे चेहरा मुलायम होऊन उजळतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)