थायरॉईडमध्ये बीट खाण्याचे फायदे
नवी दिल्ली, 05 जानेवारी : थायरॉईडसारखा त्रास आता सर्वसामान्य आजार बनू लागला आहे. थायरॉईड (Thyroid)लक्षात यायला बराच वेळ लागतो. थायरॉईडची लक्षणं सर्वसामान्य असल्यामुळे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. थायरॉईडच्या ग्रंथी थायरोक्सिन हार्मोन्सचं उत्पादन करते. थायरॉईडच्या ग्रंथी जास्त प्रमाणात हार्मोन्सचं उत्पादन करायला लागल्याने किंवा उत्पादन कमी व्हायला लागल्याने हा त्रास होतो. थायरॉक्सिन हार्मोनच प्रमाणात शरीरात योग्य असायला लगातं. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हा आजार होण्याचं प्रमाणं जास्त आहे. थायरॉईडची लक्षणं दिसल्यानंतर तत्काळ उपचारांची आवश्यकता असते. उपचारांबरोबर काही फळे किंवा भाज्या खाल्ल्यानेही फायदा होतो. बीट - बीटामध्ये गोयट्रोजन्स (Goitrogens) नावाचा घटक असतो. ज्यामुळे थायरॉईड हार्मोन जास्त प्रमाणात बनत नाहीत. त्यामुळे ज्यांच्या शरीरामध्ये थायरॉइड ग्रंथी अति सक्रिय झालेल्या आहेत, त्यांनी कोशिंबीरमध्ये बीटाचा वापर करावा. बीटाचा ज्यूस पिण्याने देखील फायदा होतो. त्यामुळेच थायरॉईड रुग्णांनी बीटाचा आपल्या आहारात समावेश करावा. आवळा - थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांना आवळा खाण्याने फायदा होतो. आवळा थायरॉईड हार्मोन्स नियंत्रित करण्याचं काम करतो. यासाठी तुम्ही आवळा पावडरही घेऊ शकता. आवळा पावडर मधात एकत्र करून उपाशीपोटी घेतल्याने फायदा होतो. याशिवाय आवळासुपारी देखील खाऊ शकता. आवळा पावडर थायरॉईडबरोबरच इतर आजारांसाठी देखील फायदेशीर आहे. कोबी थायरॉईड झालेल्या लोकांसाठी कोबी खाण्याचा सल्ला दिला जातो. कोबीमध्ये गोयट्रोजन्स नावाचा घटक असतो. जो थायरॉईड हार्मोन उत्पादनांमध्ये मदत करतो. त्यामुळे याचा आहारामध्ये समावेश करावा. दोन दिवसांनी कोबीची भाजी बनवून किंवा सॅलडमध्ये टाकून कोबी खाणं फायदेशीर ठरतं. पण, काही रुग्णांमध्ये डॉक्टर कोबी न खाण्याचा सल्ला देतात.
ऍन्टीऑक्सीडेंट एंटीऑक्सीडेंट असणाऱ्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश असायला हवा. जांभूळ, द्राक्ष, टोमॅटो, अक्रोड, दही यासारखे पदार्थ थायरॉईडच्या रुग्णांनी खायला हवीत. यामुळे थायरॉईड हार्मोन नियंत्रणात येतात. एंटीऑक्सीडेंटमुळे स्ट्रेस देखील कमी होतो. हे वाचा - अती सकारात्मकताही ठरू शकते घातक! पाहा काय असते ‘टॉक्सिक पॉझिटिव्हिटी’ (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)