JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / पपईसोबत कधीच खाऊ नये हे आंबट पदार्थ, नाहीतर होतात हे गंभीर साईड इफेक्ट्स

पपईसोबत कधीच खाऊ नये हे आंबट पदार्थ, नाहीतर होतात हे गंभीर साईड इफेक्ट्स

पपईवर लिंबू पिळून खायला अनेक जणांना आवडतं . मात्र, आंबट पदार्थ पपईबरोबर खाण्याने किती साईड इफेक्ट (Side Effect) होतात माहिती आहे का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली,11 जुलै : बाजारात सहजपणे मिळणारी पपई आरोग्यासाठी फायदेशीर (Health Benefits Of Papaya) असल्यामुळे बरेच जण आवडीने खातात. पपईमध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, मॅग्नेशियम,पोटॅशियम,कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. यात फायबरची मात्र जास्त असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित (Cholesterol Control) राहतं. पपई मधल्या व्हिटॅमीन ए मुळे (Vitamin A) डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. तर पांढऱ्या पेशी (White Cells) वाढवण्यासाठी देखील डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देतात. पिकलेल्या पपईबरोबर कच्च्या पपईची भाजी,लोणचं आणि कोशिंबीर बनवून देखील खाल्ली जाते. एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलरीज असतात. पपई वजन कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर आहे. कारण पपईमुळे पचन व्यवस्था सुधारते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती**(Immunity Booster)** देखील वाढते. महिलांना पपई खाण्याचा सल्ला दिला जातो कारण मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना पपईमुळे कमी होतात. झोपेत पायदुखीच्या दुखण्यानं झालात हैराण?, या 5 घरगुती उपायांचा होईल फायदा पपई खाण्याचे अनेक फायदे असले तरी काही पदार्थांबरोबर पपईचं कॉम्बिनेशन घातक आहे. पपई आणि दही पपई आणि दही कधीच एकत्र खाऊ नये पपई गुणधर्माने गरम आहे तर दही थंड. त्यामुळे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले तर, पोटासाठी हानिकारक ठरता. घातक आहेत ‘हे’ Foods Combinations; चुकूनही एकत्र खाऊ नका लिंबू आणि पपई बरेच जण पपईवरती लिंबू पिळून खाता. मात्र लिंबू आणि पपई कधीच एकत्र खाऊ नये. कारण यामुळे ऍनिमिया सारखा त्रास होऊ शकतो. पपई खाल्ल्यानंतर काही तासांनीच लिंबू खावा किंवा लिंबाचा पदार्थ खावा. गृहिणींना पावसाळ्यात बटाटे सडण्याची भीती? या पद्धतीने साठवण केल्यास No Tension पपई आणि संत्र लिंबू आणि पपई एकाच जातीची फळ आहेत. पपईबरोबर आंबट पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे संत्र देखील पपई बरोबर खाऊ नये. कारण याचा उलटा परिणाम शरीरावर होऊ शकतो. फ्रूट सॅलड बनवताना जर संत्र किंवा लिंबू वापरणार असाल तर त्यासोबत पपई मुळीच वापरू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या