JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / 'दिल'वालों की दिल्ली! 15 वर्षाच्या मुलीनं ऱ्हदय देऊन वाचवला महिलेचा जीव

'दिल'वालों की दिल्ली! 15 वर्षाच्या मुलीनं ऱ्हदय देऊन वाचवला महिलेचा जीव

नवी दिल्लीत 15 वर्षाच्या मुलीनं ऱ्हदय देऊन (Heart Transplant) 32 वर्षांच्या महिलेचा जीव वाचवला आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : नवी दिल्लीत 15 वर्षाच्या मुलीनं ऱ्हदय देऊन 32 वर्षांच्या महिलेचा जीव वाचवला आहे. अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (Atal Bihari Vajpayee Institute of Medical Sciences) आणि डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलने (Dr RML Hospital ) नुकतीच (22 ऑगस्ट 22) 32 वर्षीय महिलेवर पहिली हार्ट ट्रान्सप्लांट (heart transplant) सर्जरी यशस्वी केली. नवी दिल्लीतील केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या रुग्णालयात ही ऐतिहासिक आणि यशस्वी पहिली हृदय प्रत्यारोपण म्हणजेच हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया आहे, असं हॉस्पिटलने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या संदर्भात ‘एएनआय’नं वृत्त दिलंय. डॉ. नरेंद्रसिंग झाझरिया (Dr Narender Singh Jhajhria) यांच्या नेतृत्वाखाली आरएमएल रुग्णालय आणि एम्समधील कार्डिअ‍ॅक सर्जन्सची (Cardiac Surgeons) टीम त्याच संध्याकाळी पीजीआय चंडीगडला (PGI Chandigarh) पोहोचली. त्यानंतर PGIMER, चंडीगड, दिल्ली आणि चंदीगड पोलीस विभाग तसंच अलायन्स एअरच्या एअरलाइन्स मॅनेजरने (Airlines Manager of Alliance Air) अरेंज केलेल्या ग्रीन कॉरिडॉरद्वारे दोन तासांच्या आत त्‍यांनी डोनरचं हार्ट नवी दिल्‍लीला पाठवलं, असं निवेदनात म्हटलंय. CTVS चे प्रमुख डॉ. विजय ग्रोव्हर (Dr Vijay Grover ) आणि टीम, डॉ. मिलिंद होटे, डॉ. नरेंद्र झाझारिया, डॉ. पलाश अय्यर तसंच डॉ. रमेश कशेव (Dr Ramesh Kashev) आणि डॉ. जसविंदर कोहली यांच्या नेतृत्वाखालील कार्डिअ‍ॅक अॅनेस्थेसिस्ट (Cardiac Anaesthetists) यांचा समावेश असलेल्या टीमने ही सर्जरी केली. 21 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 9 वाजता सर्जरी सुरू झाली आणि 22 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 3 वाजता ती पूर्ण झाली. रुग्णाला सर्जरीनंतर स्थिर कंडिशनमध्ये CTVS ICU मध्ये हलवण्यात आलं. दरम्यान, आता रुग्णाची प्रकृती ठीक असून, ती बरी होत आहे. शिवाय तिला लावलेलं व्हेंटिलेटर (ventilator) देखील हटवण्यात आलंय. टोमॅटो फ्लूचा धोका वाढला, केंद्र सरकारकडून गाइडलाईन्स जारी ऐतिहासिक सर्जरी या संदर्भात एएनआयशी बोलताना RML हॉस्पिटलच्या डायरेक्टर आणि एम्सच्या डॉ. नंदिनी दुग्गल (Dr Nandini Duggal) म्हणाल्या, ‘ही एक मोठी आणि जिकिरीची कामगिरी असून आरएमएलमधील डॉक्टरांनी ही सर्जरी करून इतिहास रचला आहे. कारण ही सर्जरी खूप कठीण होती. या सर्जरीमध्ये सहभागी होत यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट करणाऱ्या आमच्या संपूर्ण टीमचे आभार. कारण टीमने एकत्र येत चांगले प्रयत्न केल्याने हे शक्य होऊ शकलं. तसंच CTVS कार्डिऑलॉजी विभाग (CTVS cardiology), रक्तपेढी (blood bank), ट्रान्सप्लांटसाठीचे नोडल अधिकारी, आमचे ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर, त्यानंतर चंडीगडमध्ये सुविधा पुरवणारे अनेक जण, दिल्ली एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी (Delhi airport authorities) आणि एम्स (AIIMS), या सर्वांनी ही सर्जरी यशस्वी करण्यासाठी खूप मदत केली.’ ‘या 32 वर्षीय महिलेवर आम्ही एवढी मोठी सर्जरी करण्यापूर्वी जवळपास 7-8 वर्षांपासून तिला त्रास होत होता. पण आता ती ठीक आहे. सुरुवातीला ती लहान असताना तिला कार्डिओमायोपॅथीचं (cardiomyopathy) निदान झालं होतं. तर, हार्ट डोनर ही 15 वर्षांची मुलगी होती आणि तिचा कार अपघातात मृत्यू झाला होता. पण मृत्यूनंतर कुटुंबियांनी तिचे अवयव दान केल्याने तिच्या माध्यमातून सहा जणांचे प्राण वाचवण्यास मदत झाली,’ असं या सर्जरी टीममधील महत्त्वाचा भाग असणारे डॉ. विजय ग्रोव्हर यांनी सांगितलं. पोटाच्या कॅन्सरची ‘ही’ आहेत लक्षणं; आढळल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष डॉ. किरण चौधरी यांच्या नेतृत्वाखालील ब्लड बँक टीम, ट्रान्सप्लांट नोडल अधिकारी डॉ. एच एस महापात्रा यांच्या अध्यक्षतेखालील हॉस्पिटलचे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, ABVIMS, Dr R M L Hospitalच्या डायरेक्टर आणि मेडिकल सुप्रिटेंडंट डॉ. नंदिनी दुग्गल यांच्या देखरेखीखाली विविध विभागांच्या कोऑर्डिनेशनमुळे हा अत्यंत कठीण प्रयत्न यशस्वी झाला. आपल्या देशातील सार्वजनिक आरोग्य सेवा संस्थांमध्ये अशा प्रकारच्या यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांटची वाढती गरज आहे, त्याचा फायदा देशात अनेक भागातील सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित रुग्णांना होऊ शकतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या ABVIMS, RML हॉस्पिटलने पहिली यशस्वी सर्जरी करत या प्रयत्नात पहिलं पाऊल टाकलं आहे. लक्ष्मी देवी (Laxmi Devi) यांना प्रसूत झाल्यानंतर हृदयविकाराचा त्रास झाला होता, त्यानंतर त्यांचं हृदय अशक्त झाल्याने दैनंदिन व्यवहार करणंही अवघड झालं होतं. त्यांच्या शरीरात हृदय प्रत्यारोपण करण्यात आल्याचं हॉस्पिटलच्या प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. 41 व्या वर्षी सोनालीचा मृत्यू; कशामुळे आणि किती वेळा येऊ शकतो Heart Attack? 6 जणांचे प्राण वाचले त्यापूर्वी डॉ रंजित नाथ (Dr Ranjith Nath ) आणि डॉ प्रवीण अग्रवाल (Dr Praveen Agarwal) यांच्या नेतृत्वाखालील कार्डिऑलॉजिस्ट टीमने आरएमएल हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीदेवीच्या चाचण्या आणि तपासण्या केली व हार्ट ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांची नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन (NOTTO) मध्ये नोंदणी करण्यात आली. 15 ऑगस्ट रोजी एका भीषण रस्ते अपघातात (Road Accident) 15 वर्षीय मुलगी जखमी झाली होती. पुढे उपचारांदरम्यान 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास मुलीला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. परंतु, तिचे अवयव चांगल्या स्थितीत राहावे, यासाठी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर चंडीगड रुग्णालयातील ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरने तिच्या कुटुंबीयांचं अवयव दानासाठी काउन्सेलिंग केलं. त्या मुलीचे वडील अजो मांझी मजूर म्हणून काम करतात, त्यांनी त्यांच्या मुलीचं अवयव दान (Organ Donation) करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी सकाळी NOTTO ने PGIMER-चंडीगड येथे डोनरचं हार्ट उपलब्ध असल्याचा अलर्ट दिला आणि पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली. दरम्यान, या मुलीने मृत्यूनंतर बिहारमधील भागलपूर (Bhagalpur) येथील एका महिलेसह सहा जणांचे प्राण अवयव दानातून वाचवले. या मुलीचं हृदय लक्ष्मी देवींना ट्रान्सप्लांट करण्यात आलं आणि त्यांचा जीव वाचला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या