JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / गरोदरपणात महिलांनी अंडी खावीत की नाही? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

गरोदरपणात महिलांनी अंडी खावीत की नाही? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

गर्भवती महिलांनी अंडी खावीत की नाही, गरोदरपणात अंडी खाल्ल्यानं फायदा होतो की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 मुंबई, 19 डिसेंबर :  गर्भवती महिलांनी कोणते पदार्थ खावेत, कोणते पदार्थ खाऊ नयेत, याबाबत डॉक्टर अनेक प्रकारचे सल्ले देतात. बऱ्याच घरांत नाश्त्यासाठी अंडी किंवा त्याचे पदार्थ खाल्ले जातात. अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, पण गर्भवती महिलांनी अंडी खावीत की नाही, गरोदरपणात अंडी खाल्ल्याने त्याचे फायदे होतात की नुकसान, अंडी कशी खायला हवीत, गरोदर महिलांनी अंडी खाल्ल्यास त्याचा बाळावर काय परिमाण होतो, बाळाच्या वाढीसाठी ते उपयुक्त आहे की नाही, असे अनेक प्रश्न महिलांना सतावत असतात. याच सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय प्रेग्नन्सीत अंडी खाणं सुरक्षित आहे? जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नंट असते, तेव्हा तिने कुठले पदार्थ टाळावेत याची यादी डॉक्टर देतात. या यादीत कच्च्या आणि अर्धवट शिजवलेल्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. कच्च्या आणि अर्धवट शिजवलेल्या पदार्थांमध्ये बॅक्टेरिया असण्याची शक्यता खूप जास्त असते, त्यामुळे गर्भवती महिला आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यास हानी पोहोचते. सामान्य लोक या कच्च्या किंवा अर्ध्या शिजवलेल्या पालेभाज्या किंवा पदार्थ सहजपणे खाऊ शकतात, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप मजबूत असते. परंतु गर्भवती महिलांच्या बाबतीत असं नसतं. गरोदरपणात महिलांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. कोकोनट मिल्क टीचे फायदे माहितीये? वजनासोबत वयही करते कमी, पाहा बनवण्याची पद्धत गर्भधारणेदरम्यान अंडी खाणं स्त्रियांसाठी पूर्णपणे सुरक्षित मानलं जातं, परंतु अंडी पूर्णपणे शिजवलेली असावी. या वेळी अर्धवट शिजवलेली अंडी गर्भवती महिलांनी खाणं टाळावं. प्रेग्नेन्सीत अंडी कशी खावी? तुम्हाला कदाचित माहिती असेल की अंड्यांमधून साल्मोनेला नावाचा आजार होण्याचा धोका खूप जास्त असतो. तो गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. या शिवाय डॉक्टर मेयोनीझचं सेवन करण्यासही गर्भवतींना मनाई करतात, कारण त्यासाठी अंडी वापरली जातात. अंड्यांमध्ये अनेक पोषकतत्त्व असतात. बरेच लोक पूर्ण शिजवून अंडी खातात, तर काहींना अर्धवट शिजवलेली अंडी खायला खूप आवडतात. अनेक देशांमध्ये तर कच्च्या अंड्यांचा पिवळा भाग म्हणजे बलक शिजवलेल्या अन्नात मिसळूनदेखील खाल्ला जातो. पण जर तुम्ही गरोदर असाल तर तुम्ही कच्चं अंडं खाणं टाळायला हवं. तसंच, गर्भवती महिलांनी कच्चं किंवा अर्धवट शिजलेलं अंडं असलेले पदार्थही खाणं टाळावं. जर तुम्ही गरोदरपणात कच्चं किंवा अर्धवट शिजवलेलं अंडं खाल्लं तर तुमच्या बाळाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात आणि  अ‍ॅम्नॉटिक फ्लुईडमध्ये इन्फेक्शनही होऊ शकतं. स्त्रीच्या गर्भधारणेनंतर, गर्भाशयात द्रव तयार होण्यास सुरवात होते, त्याला अ‍ॅम्नॉटिक फ्लुईड असं म्हणतात.

गरोदरपणात कोणत्या प्रकारे अंडी खावीत? गरोदरपणात अंडी खाण्यापूर्वी नीट शिजवून घ्या. अंड्याचं बलक वाहणारं नाही, याची विशेष काळजी घ्या. अंडी पूर्णपणे शिजण्यासाठी सुमारे 10 ते 12 मिनिटं लागतात. जर तुम्ही तळलेली अंडी खात असाल तर ती दोन्ही बाजूंनी 2 ते 3 मिनिटं शिजवा. सुपर मार्केटमधून अंडी विकत घेताना थोडी काळजी घ्या. तिथून अशीच अंडी खरेदी करा ज्या अंड्यांच्या पॅकिंगवर “pasteurized” लिहिलेलं असेल. गरोदरपणात अंडी खाण्याचे फायदे गरोदरपणात अंडी खाणं महिलांसाठी खूप फायदेशीर ठरतं. पण ते पूर्णपणे चांगलं शिजवलेलं असावं, याची विशेष काळजी घ्या. अंड्यांमध्ये फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट फार कमी प्रमाणात आढळतात. हायप्रोटीन आणि हेल्दी फॅटयुक्त पदार्थांचं सेवन केल्याने, शरीरात रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. ज्यामुळे गर्भावस्थेतील डायबेटिसचा धोका कमी होतो. अनेक वेळा गरोदरपणात महिलांना जेस्टेशनल डायबेटिस होतो. दरम्यान, काही विशिष्ट प्रकारच्या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी आढळते. ऑरगॅनिक पद्धतीने वाढवलेल्या कोंबडीच्या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात आढळतं. डिलिव्हरीनंतर चेहऱ्यावर काळे डाग आलेत? चिंता सोडा, करा एक्स्पर्स्टसने सांगितलेले हे उपाय गर्भातील बाळांसाठी अंडी कशी फायदेशीर आहेत? अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक आढळतात, जे तुमच्या बाळाच्या वाढीस आणि विकासास मदत करतात. त्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 आणि कोलीनसारखी पोषक तत्त्वं मुबलक प्रमाणात आढळतात, जी निरोगी मेंदूच्या विकासात योगदान देतात. त्यामुळे गरोदरपणात महिलांनी अंडी खाल्ल्यास त्याचा बाळांनाही खूप फायदा होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या