मेथीचे दाणे बारीक करून त्याची पावडर बनवा आणि नंतर त्यात आवळा पावडर आणि हळद मिसळा
आजकालच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या लाइफस्टाइलमुळे अगदी तरुण वयातच डायबेटीस (Diabetes) , रक्तदाब (Blood Pressure) , हृदयविकार (Heart Problem) असे विकार अनेकांना गाठत आहेत. डायबेटीस, रक्तदाब अशा आजारांशी झुंजणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डायबेटीसचे रुग्ण जगभरात आणि आपल्या देशातही झपाट्याने वाढत आहेत. डायबेटीस हा गुंतागुंत असलेला आजार असून यामध्ये रुग्णाला सतत रक्तातल्या साखरेची पातळी तपासावी लागते. या आजारात थोडासा निष्काळजीपणाही जीवघेणा ठरू शकतो. कारण त्यामुळे किडनीचे आजार, हृदयविकार यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. डायबेटीस असलेल्या रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घ्यायची असते. त्यांनी ग्लुकोजची पातळी नियंत्रित करू शकणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. ग्रेटर नोएडामधल्या जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या प्रसिद्ध डाएटिशियन डॉ. आयुषी यादव (Dr. Ayushi Yadav) यांनी डायबेटीसच्या रुग्णांसाठी उपयुक्त असलेल्या एका पदार्थाबद्दल सांगितलंय. त्यांच्या मते, डायबेटीसच्या रुग्णांसाठी मेथीची पानं (Fenugreek Leaves) घातलेल्या रायत्याचं सेवन करणं खूप फायदेशीर आहे. या रायत्याचा शरीराला कसा उपयोग होतो, हे जाणून घेऊ या. (Keratin Rich Foods: या 4 पदार्थांमुळे केस गळतीवर बसेल लगाम, वजन कमी करण्यासाठीही होईल फायदा) मेथीच्या पानांमुळे भोजनाचा स्वाद वाढतो. त्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फॉलिक अॅसिड, रिबोफ्लिन आणि कॉपर हे घटक असतात, म्हणूनच मेथीची पानं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. मेथीची पानं डायबेटीसविरुद्ध प्रभावीपणे कार्य करतात. कारण त्यात सोल्युबल फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात. ते कार्बोहायड्रेट्स शोषून घेण्याचं काम मंदावतात. त्यामुळे पचन हळू होतं आणि रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. - डायबेटीसच्या रुग्णांनी मेथीच्या पानांचंच सेवन करावं असं नाही. मेथीचे दाणेदेखील आहारात समाविष्ट करू शकता, तेही डायबेटीसच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहेत. मेथीचे दाणे रक्तातल्या साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. (हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर ) - मेथीचं पाणीही (Fenugreek Water) डायबेटीसच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे. मेथी रात्रभर गरम पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी गाळून ते पाणी प्या. तसंच मेथी पाण्यात उकळल्यानंतर ते पाणी थंड करूनही ते पिऊ शकतात. - मेथीचा प्रभाव वाढवायचा असेल तर त्यात काही घटक मिसळू शकता. मेथीचे दाणे बारीक करून त्याची पावडर बनवा आणि नंतर त्यात आवळा पावडर आणि हळद मिसळा. हे एक चमचा मिश्रण दिवसातून 3 वेळा सेवन करा, त्याचा उपयोग होईल.