JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / Side Effects of Apple : ...तर सफरचंदामुळेच डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल

Side Effects of Apple : ...तर सफरचंदामुळेच डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल

‘अॅन अॅपल अ डे किप्स डॉक्टर अवे’, असं म्हटलं जातं. त्यामुळे सफरचंदाचे आरोग्यासाठी फायदे तुम्हाला माहिती असतील पण दुष्परिणाम माहिती आहेत का?

0105

सफरचंद खाणं हे आपल्या आरोग्यासाठी जरूर फायदेशीर असतं, परंतु त्याच्या अतिरिक्त सेवनामुळे आपल्या आरोग्याला त्याचा धोका होण्याची संभावना असते. त्यामुळे सफरचंद हे योग्य प्रमाणातच खायला हवं.

जाहिरात
0205

पचनसंस्थेवर दुष्परिणाम : सतत सफरचंद खाण्याची सवय ही आपल्या पचनसंस्थेवर परिणाम करू शकते. सफरचंदात मोठ्या प्रमाणात फायबरचं प्रमाण असल्यामुळे आपल्याला पोटाचा विकारही होण्याची शक्यता असते.

जाहिरात
0305

रक्तदाबाची समस्या : जास्त प्रमाणात सफरचंद खाल्याने आपल्याला रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांसाठी अतिरिक्त प्रमाणात सफरचंद खाणं धोक्याचं ठरू शकतं.

जाहिरात
0405

लठ्ठपणाची समस्या : जर तुम्ही सतत सफरचंद खात असाल तर तुम्हाला लठ्ठपणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. कारण त्यामध्ये कार्बोहायड्रेडचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे लठ्ठपणाचा सामना करावा लागू शकतो.

जाहिरात
0505

दातांचे विकार : जास्त प्रमाणात सफरचंद खाल्ल्यामुळे आपले दात खराब होण्याची शक्यता जास्त असते. कारण सफरचंद हे अॅसिडिक असतं. त्यामुळे हे फळ योग्य प्रमाणातच खायला हवं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या