प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
इंदौर, 15 जानेवारी : नेपाळमधील विमान दुर्घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं आहे. यानंतर आता भारतातील विमानातही भयंकर घडल्याची बातमी समोर आली आहे. भारताअंतर्गत विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाला रक्ताच्या उलट्या झाल्या. यानंतर विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. पण त्या प्रवाशाला वाचवता आलं नाही. त्याचा जीव गेला. मदुराईहून दिल्लीला जाणाऱ्या एका खासगी विमानात 60 वर्षांच्या प्रवाशाची तब्येत बिघडली. त्यामुळे विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मध्य प्रदेशच्या इंदौरमधील देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळवर शनिवारी हे विमान लँड झालं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्या प्रवाशाला तात्काळ एअरपोर्टजवळील रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हे वाचा - Nepal Plane Crash : 72 जणांसह विमान कोसळतानाच पहिला थरारक VIDEO समोर, 45 मृतदेह सापडले पीटीआयशी बोलताना विमानतळाचे अधिकारी प्रबोध चंद्र शर्म यांनी सांगितलं की माहितीनुसार इंडिगो एअरलाइनच्या 6ई-2088 विमानातून प्रवास करणाऱ्या 60 वर्षांच्या अतुल गुप्तांच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. प्रवासात त्यांनी प्रकृती बिघडली. त्यामुळे मदुराईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचा मार्ग बदलून ते इंदौरच्या विमानतळावर लँड करण्यात आलं.
शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता विमान लँड झालं. तिथून गुप्ता यांना एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हे वाचा - Nepal Plane Crash: टेकऑफच्या 20 मिनिटात जळालेल्या मृतदेहांचा सडा; नेपाळ विमान दुर्घटनेचे भयाण वास्तव विमातळावरून रुग्णालयात नेणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की या प्रवाशाला हृदय रोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह होता. एयरोड्रम पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकांनी सांगितलं की, गुप्ता नोएडामधील रहिवासी आहेत. पोस्टमॉर्टेमनंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवला जाईल. दरम्यान गुप्ता यांची तब्येत बिघडल्यानंतर इंदौरमध्ये एमर्जन्सी लँड करण्यात आलेलं विमान शनिवारी सायंकाळी 6.40 ला दिल्लीसाठी रवाना झालं.