JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / Winter Workouts : हिवाळ्यातही फिटनेस राखणं सोपं, फक्त हे 6 व्यायाम प्रकार नियमित करा

Winter Workouts : हिवाळ्यातही फिटनेस राखणं सोपं, फक्त हे 6 व्यायाम प्रकार नियमित करा

Winter Workouts : अनेकांना हिवाळ्यात व्यायाम करायला आवडतं. त्यावेळी काही जीम लाऊन शारिरीक कसरत करत असतात. त्यातच हिवाळ्यात कुणाचंही आपल्या खानपानावर कंट्रोल राहत नाही. त्यामुळं आपल्याला अशा आपल्याला कोणत्या प्रकारचे व्यायाम करायला हवे आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्या याविषयी जाणून घेऊयात. पाहा PHOTOS

0106

Skipping : हिवाळ्यात Skipping ची कसरत घरी सहजपणे करता येते. एका दिवसात 150 ते 200 वेळा दोरीने उडी मारणं पुरेसं आहे. जेवण झाल्यावर लगेचच Skipping करू नये.

जाहिरात
0206

Mountain Climber : हिवाळ्यात अनेकजण हे आपल्या खाण्यापिण्याबाबत बेफिकीर असतात. त्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. अशा परिस्थितीत गिर्यारोहण करणे हा व्यायामाचा उत्तम प्रकार आहे.

जाहिरात
0306

Push Ups : शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासोबतच स्नायूंना बळकट करण्यासाठी पुश अप्स ही एक उत्तम कसरत ठरू शकते. Push Ups हे आपल्या पोटाला सडपातळ ठेवण्यासाठी आणि खांदे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.

जाहिरात
0406

Crunches : हा व्यायाम केल्याचा शरीराला खूप फायदा असतो. असं केल्यामुळं पोटाचे स्नायू मजबूत होतात. त्याचबरोबर यामुळे कंबरेची चरबी कमी होण्यास मदत होते.

जाहिरात
0506

Running : दररोज नियमित धावण्याने आपलं शरीर तंदुरुस्त होते. शरीराच्या स्नायूंना तसेच हृदय, पोटासह इतर अवयवांना या व्यायामाचा फायदा होतो.

जाहिरात
0606

Swimming : पाण्यात पोहण्यामुळे आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच अतिरिक्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते. नियमित पोहण्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहु शकते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या