JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / ताप डेंग्यूचा आहे की साधा? लक्षणांमधील या फरकांवरून सहज ओळखा येतं

ताप डेंग्यूचा आहे की साधा? लक्षणांमधील या फरकांवरून सहज ओळखा येतं

डेंग्यू आणि विषाणूजन्य तापाची (व्हायरल) लक्षणे सारखीच आहेत, ज्यामुळे बरेच लोक दोन्हीतील फरक ओळखू शकत नाहीत. अशा स्थितीत रुग्णाची प्रकृती बिघडते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये डेंग्यू आणि विषाणूजन्य तापाने थैमान घातले आहे. राजधानी दिल्ली, यूपी आणि बिहारसह महाराष्ट्रातही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे लोकांचे टेन्शन वाढले आहे. डेंग्यू आणि विषाणूजन्य तापाची (व्हायरल) लक्षणे सारखीच आहेत, ज्यामुळे बरेच लोक दोन्हीतील फरक ओळखू शकत नाहीत. अशा स्थितीत रुग्णाची प्रकृती बिघडते. डेंग्यूची लक्षणे ओळखून वेळीच उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकते. आता प्रश्न असा पडतो की, या दोन्ही तापाची लक्षणे सारखीच असताना डेंग्यू आणि व्हायरल कसे ओळखायचे. याबद्दल, आम्ही हवाई दलाचे माजी वैद्यकीय अधिकारी आणि फिजिशियन डॉ. वरुण चौधरी यांच्याकडून मोठ्या गोष्टी जाणून घेतल्या. डेंग्यू आणि व्हायरल तापाचे कारण काय? डॉ. वरूण चौधरी यांच्या मते, विषाणू संसर्गामुळे व्हायरल ताप येतो. त्यामुळे सर्दी, खोकला, तापाचा त्रास होत आहे. ऋतू बदलत असताना कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक या विषाणूच्या तावडीत सापडतात. विषाणूजन्य ताप साधारणपणे 5 ते 7 दिवसांत आपोआप बरा होतो. डेंग्यू ताप हा संक्रमित डास चावल्यामुळे होतो आणि त्याची लक्षणे डास चावल्यानंतर काही दिवसांनी दिसून येतात. डेंग्यूवर योग्य उपचार न झाल्यास त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर बनते. त्याचा परिणाम यकृतावरही दिसून येतो. डेंग्यू हा देखील विषाणूजन्य ताप आहे, परंतु तो फक्त डास चावल्याने होतो. डेंग्यू आणि व्हायरल फिव्हरमधील फरक जाणून घ्या - डेंग्यूमुळे खूप जास्त ताप येतो. त्याला ब्रेक बोन फिव्हर असेही म्हणतात. विषाणूजन्य तापामुळे जास्त ताप येत नाही. - डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या त्वचेवर लाल पुरळ येतात, परंतु व्हायरल फिव्हरमध्ये त्वचेवर कोणत्याही खुणा दिसत नाहीत. डेंग्यूमुळे प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होते. व्हायरल फिव्हरमध्ये प्लेटलेटच्या संख्येवर फारसा परिणाम होत नाही. डेंग्यू तापामुळे अनेकांचा रक्तदाब कमी होतो, तर विषाणूजन्य तापात रक्तदाबावर कोणताही परिणाम होत नाही. डेंग्यूमुळे उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होतो. डेंग्यूचा यकृतावरही परिणाम होतो. व्हायरल फिव्हरमध्ये उलट्या किंवा पोटदुखीचा त्रास होत नाही.

दोघांवर उपचार काय? डॉक्टर वरुण चौधरी म्हणतात की, ताप आल्यावर लोकांनी रक्त तपासणी करून घ्यावी. रक्त तपासणीमध्ये तुम्हाला डेंग्यू आहे की नाही हे कळेल. उपचारांबद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही स्थितींमध्ये लोकांना पॅरासिटामॉल गोळी दिली जाते. डेंग्यू आणि विषाणूजन्य तापाच्या स्थितीत प्रतिजैविक घेणे टाळावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्यावे. जर तुम्ही योग्य वेळी डेंग्यूवर उपचार केले तर तुम्ही 1 आठवड्यात सहज बरे होऊ शकता. तर विषाणूजन्य ताप 5 ते 7 दिवसात औषध घेतल्याने बरा होईल. हे वाचा -  डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत कापूर तेलाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या